जय अंबे गौरी: एक मानसपूजा.

ओम जय अंबे गौरी
मैया जय शामा गौरी.
तुमको निशिदिन ध्यावत
हरि ब्रम्हा शिवजी.

सावन मधून ही आरती सिलेक्ट केली की सुरू होते एक महापूजा. मनातल्या मनातच. पहाटेच्या शांत वेळी. कामाचा धबडगा अजून सुरु व्हायचा आहे आणि कालचे घाव, मानसिक आंदोलने निद्राराणीने दूर पाठवलेली असतात. मन स्वच्छ आणि अलर्ट असते.

मानस पूजेची पहिली तयारी म्हणजे मन अतिशय साफ करणे, काम , क्रोध, मद मत्सर
आदि भाव पार काढून एखाद्या निष्पाप निरागस मुलासारखे बनणे. झोपेतून उठल्यावर
लेकराला जशी आईची आठवण पहिले येते तसे मन देवीच्या मंदिराकडे चालू लागते. काय त्या
मंदिराचा थाट. प्रचंड मोठ्या हिरव्या गार कुरणात हे स्फटिकातून घडविलेले मंदिर उभे आहे.
त्याचे सोनेरी कळस पहाटेच्या कोवळ्या उन्हात चमकत आहेत. पायर्‍यावर प्रेमाच्या सतरंज्या
ठेवल्या आहेत. हवी त्याने उघडून घ्यावी व त्यावर बसावे. बागेत ससे पाखरे बागडत आहेत.

बारकी बारकी मुले खेळत आहेत. पृथ्वीवर अनेक हाल सहन केलेले त्यांचे आत्मे आता इथे सुखात आहेत. आयलान कुर्दी... त्याच्या हातात एक पेस्ट्री आहे व मोठा भाउ त्याच्याशी बॉलने खेळत आहे. बायकांची गडबड चालू आहे. नैवेद्य रांधणे चालू आहे. ह्या कोण आहेत. देशो देशींच्या
मुली व स्त्रिया, पृथ्वीवर त्या हुंडा बळी, अत्याचाराच्या बळी होत्या. पण आता त्या नव्या उत्साहाने फुलत आहेत. काही रांगोळी घालत आहेत तर काही पूजेच्या तयारीत, पुष्परचना करण्यात मग्न आहेत. चेहर्‍यावर दु:खाचे निशाण देखिल नाही. कसे असेल?

मांग सिंदूर विराजै तीको मृग मद को.
उज्वल से दो नैना चंद्रवदन नीको

अशी गौरीमा त्यांच्याकडे सौहार्द पूर्ण नजरेने बघत आहे.

कनक समान कलेवर रक्तांबर राजे.
रक्त पूष्प गल माला कंठन पर साजे

अशी ती भरजरी लाल साडी नेसलेली गळ्यात लाल रंगाचे
दागिने घातलेली.सोन्या समान झळाळते आहे. आपल्या मुली व बाळांकडे अतीव सुखाने बघत आहे.

केहरी वाहन राजत खड्ग खपर धारी.
सुरनर मुनीजन सेवत तिनके दुख हारी
कानन कुंडल शोभित. नासाग्रे मोती
कोटिक चंद्र दिवाकर राजत सम ज्योती.

चला ह्या जगन्मातेची महा पूजा आरंभ करू या.

जागो जागी रत्न दीप लागले आहेत. चंद्रमा देखील पूर्ण रूपाने उपस्थित आहेत. त्यांच्या प्रकाशात माता अगदी अप्रतिम दिसते आहे. सोन्याच्या थाळीत सर्व पूजासाहित्य तयार आहे. गुलाब कमळ
पुष्पे रत्नखचित परडीत सुगंध देत आहेत. हे पूजेला लाल रेशमी वस्त्र नेसलेले, काळे साव्ळे भक्कम व्यक्तिमत्वाचे पुरुष अस्तित्व को ण बरे माझ्या सोबत उभे आहे? हे तर माझ्यातलेच पुरुष तत्व!! भक्त गण प्रसन्न चित्ते बसले आहेत.

शुंभ निशुंभ विदारै, महिषा सुर घाति
धुम्र विलोचन नैना निशिदिन मदमाती.
चंड मुंड संहारै शोणित बीज हरे.
मधु कैतभ दौ मारे सुर भयहीन करे

अशी ही माता असताना भीति कसली आणि कशाची? सर्व मंगल होते आहे आणि होणारही आहे.
स्नान पुष्पसमर्पण झाले आहे. वस्त्र दिले आहे. नैवेद्य दाखवतो आहे.

ब्रम्हाणी रुद्राणी तुम कमला रानी
आगम निगम बखाणि तुम शिव पटरानी.

अति आनंदाचे वातावरण आहे.

चौसठ योगिनी गावत, नृत्य करत भैंरो.
बाजत ताल मृदंगा और बाजत डमरू.
ओम जय अंबे गौरी.

सर्व गण उपस्थित जन आरतीला उभे राहिले आहेत. धूप दीप, अगरबती चा सुगंध वातावरणात पसरला आहे. वाद्य वृंद तयारीत आहे. पखवाज सतार, तानपुरा सुरात तयार आहेत. झांजा वाजवायला मुले उत्सुक आहेत.

तुम ही जग की माता, तुम ही हो भर्ता
भक्तन की दुख हर्ता सुख संपत्ती करता

भुजा चार अति शोभि वर मुद्रा धारि
मनवांछित फल पावत सेवत नरनारी.
ओम जय अंब गौरी
कांचन थाल विराजत अगर कपुर बाति
श्रैमाल केतू मे राजत कोटी रतन ज्योति.
ओम जय अंबे गौरी..

लाखो रत्नांची प्रभा आसंमंतात पसरली आहे सूर्याचे आगमन नुकतेच झाले आहे व पक्षि गण
दे खिल आप्ल्या आरतीत सामिल झाले आहेत. ते दिव्य पक्षी मधुर कूजन करीत आहेत.
मंद वारा वाहात आहे.

मां मला व सर्व उपस्थित भक्तांना आशीर्वाद देते प्रसाद ग्रहण करून आम्ही आपापल्या
निहित कार्याला निघत आहोत. शक्तीने, जोमाने. प्रेमाने. आमचे जग आम्हाला सुरेख बनवायचे आहे. मेहनतीने उभे करायचे आहे.

श्री अंबे जी की आरती जो कोई नर गावै.
कहत शिवानंद स्वामी सुख संपती पावे.
ओम जय अंबे गौरी.ओम जय अंबे गौरी.

Keywords: 

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle