आर्ट वर्कशॉप्स

नमस्कार मैत्रिणींनो,

फारा दिवसाने मैत्रिणवर येतेय.. ह्या कोरोना आणि लॉकडाउनमुळे सगळंच उलटपालट झालय.. व्यवधाने वाढलीत त्यामुळे ईथे येणं जरा कमीच झालं. :sheepish:

यापुर्वी मैत्रिणवर मी काढलेली पेन आणि इन्कची चित्रे, Zentangle चित्रे पोस्ट केली होती.... म्हणजे आतापर्यंन्त स्वान्तसुखाय चित्र काढणं चालू होते. :) तेव्हा काही मित्र-मैत्रीणीनी Zentangle किंवा चित्रे काढायला शिकवशील का विचारले होते पण हे शिकवण्याचे काम-बिम काय आपल्याला जमायच नाही म्ह्णून कधीच मनावर घेतलं नव्हतं :ड Isshh

पण ह्या लॉकडाउनमुळे सगळी दिशाच बदलली. सगळीच व्यावसायिक कामं, ल्युमिअरचे काम एकदम ठप्प झालं. आणि उलट अनपेक्षितपणे घरातली सगळीच कामं अंगावर पडली त्यामुळे सगळ्यांप्रमाणेच मलाही भांबवयाला झालं. एक-दिड महिना एकूण परिस्थितीशी जुळ्वण्यातच गेला. मग त्यानंतर अजून काय करता येईल विचार करता करता खरंच चित्र काढणं शिकवता येईल का? प्रयत्न तरी करुन पाहुया का? त्यातही ऑनलाईन शिकवायचे म्हणजे अजून दडपण!! बोलायचे कसं ईथपासुन तयारी :ड मग माझ्या पार्टनरशी खूप चर्चा करुन हे एकदा करुन पाहू असं ठरवलं. नंतर सगळ्या तांत्रिक बाजू समजावून घेता घेता अजून काही दिवस गेले आणि मग म्हटलं आता श्रीगणेशा करुयाच.

कोरोनाच्या एकूण सांसर्गिक प्रकोपामुळे लोकामध्ये ताण-तणाव निर्माण झाले आहेत. याचा लोकांच्या मानसिक स्थितीवर पण फार मोठ्या प्रमाणावर परिणाम होत आहे. आणि Zentangle आर्ट ही विशेष करुन Self-help थेरपी म्ह्णून वापरली जाते. Deep relaxing आणि stress-free होण्यासाठी ती प्रभावी आहे त्यामुळे शिकवण्याची सुरुवात Zentangle नेच करायचे ठरलं.

Zentangle चे अजून फायदे म्हणजे relaxation, एकाग्रता वाढणे, तुमच्या creative abilities जोपासणे आणि वाढवणे, लहान मुलांसाठी हात आणि डोळे यांचे co-ordination सुधारणे असे बरेच आहेत.

एकूणात Zentangle ही कला आबालवृध्द... सगळ्या वयोगटासाठी आहे.

गेल्या महिन्याच्या अखेरीस ३ बॅचेस (घाबरत घाबरत) ठेवल्या. :sheepish: पण त्याला खूप छान प्रतिसाद मिळाला. :)
३ ही बॅचेसमध्ये सहभागी अगदी उत्साही आणि जिज्ञासू होते त्यामुळे आम्हालाही शिकवायला मजा आली.
मैत्रिणवरील काही मैत्रिणी आणि काही मैत्रिणींच्या चिल्ल्या पिल्ल्यांनी ही या वर्कशॉप मध्ये सहभाग नोंदवला होता ही खूप आनंदाची गोष्ट !!

हे वर्कशॉप आयोजित करण्याचा अजून उद्देश ठेवलाय... तो असा की ज्यांना चित्र काढायचय पण भिती वाटतेय..आत्मविश्वास नाहीय त्यांच्यासाठी खास.. त्यांना प्रत्येक पायरीवर सुलभ करुन सांगायचा आमचा प्रयत्न आहे. म्हणजे अगदी बेसिक लेव्हल पासून शिकवत आहोत. बेसिकच्या ही २ लेव्हल्स ठेवल्या आहेत.. पहिल्यात अगदी सोप्पे चित्र आणि दुसर्‍या लेव्हल थोडेसे अवघड..

Zentangle कला ही मुख्यत्वे Patterns वर आधारीत आहे. त्यामुळे पहिल्या लेव्हल मध्ये ६ Patterns आणि ते Patterns वापरुन एक चित्र. दुसर्‍या लेव्हलला अजून नवीन ६ Patterns आणि आधीचे व हे मिळून एकुण १२ Patterns वापरुन एक चित्र. प्रत्येक बॅच मध्ये लिमिटेडच जागा ठेवल्या आहेत की ज्यामुळे प्रत्येकाकडे वैयक्तिक लक्ष देता येईल.

आता झालेल्या वर्कशॉपच्या छान अनुभवाने आमचाही आत्मविश्वास थोडा वाढलाय.. Blessed :) आणि शिवाय गेल्या बॅचेस मध्ये लिमिटेड जागेमुळे काही जणांना सहभागी होता आलं नव्हतं म्ह्णून पुढील विकांता पासून अजून नवीन बॅचेस केल्या आहेत.

कोणाला या वर्कशॉपची अधिक माहिती हवी असेल तर खाली दिलेल्या नं. वर किंवा Lumière - Art and Crafts पेज वर संपर्क करु शकता.

तुमच्या ओळखीत / मित्र परिवरात कोणाला शिकायचं असेल तरी नक्की शेअर करा :)
~
~

WhatsApp Image 2020-06-14 at 11.27.32 PM.jpeg
.
.
विकेंड बॅचेस (LATE EVENING)

WEEKEND BATCH-1
(Basic I) 4th - 5th July (Sat-Sun) 9.00 pm to 10.30 pm

(Basic II) 11th - 12th July (Sat-Sun) 9.00 pm to 10.30 pm

WEEKEND BATCH-2
(Basic I) 18th - 19th July (Sat-Sun) 10.00 pm to 11.30 pm

(Basic II) 25th - 26th July (Sat-Sun) 10.00 pm to 11.30 pm
_________________________________________________

फेसबुकः https://www.facebook.com/ArtTutsbyLumiere/
ईन्स्टा: https://www.instagram.com/art_tuts_by_lumiere/
ईन्स्टा: https://www.instagram.com/sane_artduet/
गुगलः https://g.page/Art-TutsbyLumiereArtandcrafts
युट्युबः https://www.youtube.com/channel/UCkzzyZA5t0JAlSPwzIQ1L9A
व्हॉटसअप: https://wa.me/919987546855

Keywords: 

कलाकृती: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle