गिटार शेल्फ

हे दोन तीन महिन्यांपूर्वीचे आहे.
अशीच एकदा आवराआवरीची लहर आलेली, आणि जवळ जवळ २० वर्षे जुन्या चालत नसलेल्या गिटार चे काय करावे कळात नव्हते. वाद्य, सरस्वती वै मुळे टाकून नक्कीच देणार नव्हते. जालावर शेल्फ करायची युक्ती मिळाली. एक दोन विडीयोज बघीतले की कशी उघडावी म्हणून, पण त्यांच्यासारखे पॉवर टुल्स नव्हते. मग हॅन्ड सॉ ने सावकाश समोरचा भाग काढून टाकला. सॅन्ड पेपर ने घासून कडा गुळगुळीत केल्या. ऑफव्हाईट अ‍ॅक्रेलीक रंग लावला. होम डीपो मधुन पातळ मोल्डींग च्या पट्ट्या मिळाल्या त्या परत सॉ ने कापून रंगवून, वुड ग्लू ने आत बसवल्या आणि शेल्फ तयार!
आत काय काय ठेवायचे ते प्रयोग चालू असतात. हा तेंव्हा फोटो काढायच्या घाईत, समोर दिसतील त्या वस्तू ठेवून काढलेला फोटो. :)
नशीबाने एक चालणारी फेअरी लाईट्स ची माळ पण मिळाली.

Screen Shot 2021-01-06 at 3.50.08 PM.png

आईला माझ्या दु:ख झाले पण! :straightface: Donttell वाद्याची मोडतोड झाली आणि माझी कला संपली म्हणून.
पण खरच ती दुरुस्तीच्या पलीकडची होती Sad बरेच भाग बदलून पण सैल झालेले. सध्यापुरतं तीला मी नव्यानं घेऊन, नव्यानं शिकेन असं सांगितलं आहे :)

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle