फोटो ॲान वूड- लाकडावर फोटोचे हस्तांतरण

हा एक मजेशीर आणि करायला सोपा प्रकार आहे. मी गेल्या चार वर्षांत घरच्या-जवळच्याना असं मिळून वीसेक फोटो केलेत. बाकीचं पाल्हाळ लावायचं नाही त्यामुळे लहानपणी प्रयोगवहीत कसं साहित्य , कृती वगैरे लिहीत असू तसं लिहिते आहे.

प्रयोजन : मनोरंजन, रिकाम्या वेळेतले उद्योग, पर्सनलाईज्ड गिफ्ट वगैरे
साहित्य : जेल मेडीयम, मॉड पॉज, लाकडी पृष्ठभाग (ज्यावर फोटो ट्रान्सफर करायचा आहे, शक्यतो फिकट रंगाचा), फोटो (प्रिंटर वापरून कागदावर प्रिंट केलेले), स्पंज, ब्रश, पाणी
Ingrediants
कृती :
१. लाकडाच्या ज्या बाजूला फोटो हवाय त्या बाजूला जेल मिडीयम (अजिबात कंजूसपणा न करता) लावायला सुरू करा.
1
२. संपूर्ण पृष्ठभाग ईव्हनली कव्हर करून घ्या.
2.
३. आता, अत्यंत काळजीपूर्वक फोटो ह्या लाकडावर ठेवा. फोटो अशा पद्धतीने ठेवायचा आहे की फोटोची प्रिंट असलेली बाजू व जेल मिडीयम ह्यांचा एकमेकांना स्पर्श व्हावा.
४. ठेवलेल्या फोटोवर जर काही सुरकुत्या असतील तर त्या प्लॅस्टीकची पट्टी किंवा जुन्या क्रेडीट कार्डने अत्यंत हळुवारपणे नीट करून घ्या. कागद आणि जेल मिडीयम ह्यांच्या मध्ये हवेचे बुडबुडे असतील तर तेही ह्याच पद्धतीने काढुन घ्या.
3
५. हे सगळं प्रकरण वाळेपर्यंत (कमीतकमी ८-१० तास) बाजूला ठेवा.
६. आता दुसरा दिवस उजाडला असेल. तर एक ओला स्पंज/ कापड, थोडं पाणी आणि लाकूड घेऊन बसा.
७. आपल्याला पाणी वापरून हलक्या हातानी चोळून कागद लाकडापासुन वेगळा करायचाय. गेल्या ८ तासांत फोटोची शाई, जेल मिडीयमने लाकडावर नेली आहे पण जास्त जोर लावला तर कागदासोबत रंगही निघेल म्हणून हलका हात.
८. सुरुवात करताना स्पंजने थोडा थोडा भाग डॅब करून, तिथला कागद काढुन पुढे जाणं सोपं पडतं.
4.
९. एकदा का सगळा कागद निघाला, धूसर फोटो स्वच्छ नितळ दिसू लागला की त्याला वाळू दे. वाळलेल्या फोटोवर मॅाडपॅाजचा एक थर लावला की झालं काम.
१०. वैकल्पिक: मी ह्या लाकडाला मागुन हॅाट ग्लुने मॅग्नेट्स लावले आहेत. तशी काहीतरी टांगायची/ ठेवायची सोय करा.
5.

टीप १. अमेरिकेतील माइकल्स ह्या दुकानात फोटो सोडून सगळ्या गोष्टी आरामात मिळतात. हल्ली भारतातही सगळं मिळतं. शोधाशोध केल्यावर सापडेल ॲमेझाॅनवर वगैरे.
टीप २. मला एक काळा पांढरा (माझा - नवर्याचा) आणि एक रंगीत (आई बाबांचा) असे दोन्ही प्रकार करून बघायचे होते म्हणून दोन फोटो. दोन्ही एकच पद्धत वापरून व्यवस्थित झाले.
टीप ३. प्रिंट करण्याआधी, फोटोची लांबी-रुंदी लाकडाच्या लांबीरुंदीशी जुळतेय का ते बघून घेणे. नाहीतर पूर्ण फोटो लाकडावर मावणार नाही.
टीप ४. फोटोवर अंक किंवा अक्षरं असतील तर प्रिंट करण्याआधी फोटो मिरर फ्लिप करणे.

बाकी, कमेंटमध्ये भेटू. Thumbsup Thumbsup

Keywords: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle