वांगीभात

2 च वांगी रहिलेली घरात...मला पूर्ण जेवण बनवायचा कंटाला आला होता, तसा तो नेहमी च येतो...म्हणून पटकन हेच बनवले. ऑथेंटिक रेसिपी अर्थात च नाही पण जे काही आहे ते चांगलं झालं आहे...

IMG_20210625_103420~2.jpg

1. तेलात राई , जीरे , हींग आणि आले लसुण पेस्ट सॉते केली.

2. मुठभर काजू आणि 15 कदीपत्ता ची पाने fry केली.

3. त्यात वांगयाचे आणि टोमेटो चे तुकडे टाकून चांगले परतून घेतले.

4. आता कांदा लसुण मसाला, गरम मसाला, हळद , धने जीरे पावडर टाकून परत परतून घेतेले.

5. त्यात भिजवलेले बासमती टाकून परतले आणि उकळते पाणी ओतुन मिठ , साखर घातले.

6. Gas फ़ास्ट ठेऊन पाणी आटले की gas एकदम स्लो करून 5 मीन झाकुन ठेवायचे आणि 5 मीन नन्तर gas बंद करायचा

7. कोथिम्बीर आणि ओ खो घालुन सजवायचं.

8. छान मोकळा वांगी भात तयार. टोमेटो नसेल घलायचा तर थोड़ा चिंचेचा कोळ घालायचा. किंचित अंबट पणा साठी...

पाककृती प्रकार: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle