गोंगुरा चिकन

गोंगुरा म्हणजे आंबाडी. भारतात असताना लहनपणी, भाकरीबरोबर बर्याच वेळा आंबाडीची भरपूर लसूण घालून केलेली चटणी खाल्लेली, किंवा भाताबरोबर, तांदळाच्या कण्या घालून केलेली पळीवाढ भाजी पण खाल्लेली, पण ईथे आल्यावर काही वर्षापूर्वी पहिल्यांदा पॅरेडाईस बिर्याणी रेस्टॉरन्ट मध्ये आंध्र स्टाईल गोंगुरा चिकन खाल्लं आणि लव अ‍ॅट फस्ट बाईट झालं. पण घरी कधी करून बघितलं नव्हतं. अशात कधीतरी युट्युब वर इकडून तिकडे उड्या मारताना, फीड मध्ये दिसलं आणि मग १०-१५ वेगवेगळे विडियोज बघून, थोडं improvise केलं आणि अफाट झालं. म्हणून इथे लिहून ठेवतिये. प्रमाण वैगरे अनदाजानेच.
नेहमीच्या कांदा टोमॅटो किंवा फार फार तर खोबरं घातलेल्या ग्रेव्हीचा कंटाळा की, मस्त आहे करायला. मेथी चिकन नंतर हेच फेवरेट झालंय आता :)

कृती:
- थोड्याशा तेलावर एक चमचा मिरे, २-३ हिरव्या मिर्च्या, अर्धा छोटा कांदा आणि आंबाडीच्या एका जुडीची पानं परतायची. पाणी घालायचं नाही. लगेच त्याचा काळ्पट रंग होतो. नीट परतलं की २-३ चमचे ओलं खोबरं घालायचं (डेसिकेटेड पण चालेल) आणि अजुन एखाद दोन मिनिटे परतायंचं. मग त्याची ओभडदोभड पेस्ट करायची.
- फोडणीसाठी नेहमीपेक्षा थोडं जास्त तेल तापवायचं. त्यात एक तमालपत्र घालायचं. हवा तर खडा गरम मसाला पण. नाही लागत खरं तर.
- त्यात एक कांदा बारीक चिरून परतायचा, सोनेरी झाला की आलं लसूण वाटण घालायचं, ते चांगलं परतलं की
- त्यात हळद आणि मीठ चोळलेले चिकन चे तुकडे घालून परतायचं. (बोन ईन फुल चिकन जास्ती चान लागतं, पण माझ्याकडे नव्हतं म्हणून मी बोन्लेस स्कीन्लेस ब्रेस्ट घेतले)
- एक वाटी पाणी घालून चिकन ७०-८०% शिजवायचं (झाकण लावलं तरी चालेल. लवकर शिजेल).
- मग त्त्यात आंबाडीची पेस्ट टाकून चांगलं मिक्स करायचं. एखादा चमचा चिकन मसाला किंवा गरम मसाला घालायचा. ( पेस्ट मध्ये हि मिर्च्या आहेत हे लक्शात असू दे)
- मीठ अ‍ॅड्जस्ट करायचं.
- झाकण लावून नीट शिजवून घ्यायचं.
आणि गरम गरम पोळी/ भाकरी, भाताबरोबर गटम.
फार कष्ट नाहीत.
Screen Shot 2021-08-30 at 11.58.34 PM.png

पाककृती प्रकार: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle