इंदुर ट्रिप

इंदोरच्या सराफा बाजार खाऊगल्लीबद्दल बरेच ऐकुन होते. मावसबहीणीच्या लग्नामुळे इंदोरला जायचा योग जुळून आला. वीकेंड जोडून होता सो एक दिवस फक्त 'खादाडीसाठी' आणी एक दिवस फिरण्यासाठी ठेवला.
इंदोरला सकाळी पोहोचताच मावशीकडे गरमागरम इंदोरी पोहे आणी जलेबीवर ताव मारला.
दुपारी छप्पन दुकान ला गेलो. इथे ओळीत 56 दुकानं आहेत खाण्यापिण्याची. चाटपासून मोमोजपर्यंत सगळे इथे मिळते.
पण आपण खायचे ते इंदोरी खासीयत असलेले पदार्थ.
विजय चाट आहे एक फेमस. तिथला खोपरा पॅटिस मस्त आहे.
बाहेरून कडक, आत चटपटीत खोबऱ्याचे सारण. टेस्टी चटण्या.
20211204_164502.jpg

इथली पाणीपुरी नक्की टेस्ट करा अप्रतिम होती. स्पायरल बटाटा चिप्स आणि पनीर टिक्का चे वेगवेगळे प्रकार पण मस्त.
20211204_163825.jpg

20211204_153130.jpg

त्यानंतर एक मस्ट ट्राय म्हणजे शिकंजी.
दहा-बारा तास दूध आटवून त्यात दही आणि ड्रायफ्रूट घालून ही शिकंजी बनवतात. अफलातून टेस्ट आहे.

सगळ्या डिश एकाच वेळी ट्राय करणे शक्य नाही किंवा मग तीन चार जणांमध्ये मिळवून एकेक डिश ट्राय करणे हा चांगला ऑप्शन आहे.

याशिवाय इतर नेहमीचे आईस्क्रीम, कुल्फी, पिझ्झा वगैरे पण खाल्लेच. चक्क इकडे पुण्यातले फेमस येवले अमृततुल्य सुद्धा आहे.
20211204_152227.jpg

एवढे खाणे झाल्यावर मग आराम करून आमचा मोर्चा सराफा बाजार कडे वळवला. इंदोर च्या प्रसिद्ध राजवाड्याच्या पाठीमागे सराफा बाजार आहे. इथे सोन्याचांदीचे दुकानं आहेत. संध्याकाळी आठ-साडेआठ नंतर ही दुकानं बंद झाली की तिथे हे सगळे स्ट्रीट फुडचे स्टॉल्स लागतात. दुपारी 56 दुकान मध्ये असलेले बरेच पदार्थ इकडे रिपीट झालेले आहेत तरी इथली खासियत म्हणजे जोशी दही बडा.
ते काका भरलेली दहीवड्याची प्लेट लीलया वरती भिरकावून कॅच करतात. अजिबात खाली सांडत नाही.युट्यूबवर यांचे व्हीडिओ आहेत. इथेच भुट्ट्याचा अप्रतिम खीस मिळतो. दहीवड्यापेक्षा हा खीस जास्त आवडला मला.

20211204_215603.jpg
इथे गराडू म्हणून एक कंदमुळ मिळते ते तळून त्याच्यावर मसाले घालून देतात. हे मात्र माझे टेस्ट करायचे राहिले त्यानंतर इंदोरच्या कुडकुडत्या थंडीमध्ये गरम गरम मसाला दूध पिणे फार मस्त वाटले. गरम गुलाबजाम, जलेबी अजून बरेच काही मिळते. रबडी सुद्धा मस्त होती.
इथे अगदी मीस करायचा नाही असा पदार्थ म्हणजे साबुदाण्याची खिचडी.

भुट्ट्याचा खीस

20211204_212736.jpg

रबडी

20211204_223155.jpg

Collage 2021-12-04 23_41_02.jpg

Collage 2021-12-04 17_40_16.jpg
असे आमचे इंदूरच्या खादाडीची ट्रिप मस्त झाली.

इंदूरच्या आसपास फिरण्यासाठी बरीच ठिकाणे आहेत उज्जैन ओंकारेश्वर मांडू, महेश्वर शिवाय ओंकारेश्वरच्या जवळ रावेरखेडी आहे जेथे बाजीराव पेशव्यांची समाधी आहे. आमच्या हातात एकच दिवस होता आणि संध्याकाळी लग्नाच्या मेहंदी फंक्शन अटेंड करायचे होते त्यामुळे जास्तीत जास्त सात वाजेपर्यंत परत येता येईल अशी ठिकाण आम्हाला कव्हर करता करायची होती. मग मांडू आणि महेश्वर असे ठरवले. मांडू खरंतर फार मोठे आहे तिथे एक दिवस सुद्धा पुरणार नाही. इंदोरहून सकाळी आठ वाजता निघालो. वाटेत इंदोरी स्पेशल पोहे, बटाटे वडे आणि कचोरी असा ब्रेकफास्ट केला. जसे जसे मांडू जवळ यायला लागले तसेतसे तिथल्या किल्ल्याचे भग्नावशेष आजूबाजूला दिसायला लागलेत. मांडू सुरू होतानाच आजूबाजूला तटबंदी, दरवाजे आणि त्याच्यातून आपण मांडू मध्ये प्रवेश करतो.
बघण्यासारखी अनेक ठिकाणे आहेत. जहाज महाल, अश्रफी महाल, निळकंठेश्वराचे देऊळ, जामा मस्जिद बाजबहादूर खानचा पॅलेस, राणी रूपमती पविलियन वगैरे. आम्ही जहाज महल आणि रूपमती पॅव्हेलियन ही दोन ठिकाणे बघण्याचे ठरवले होते.
जहाज महल अतिशय सुंदर आहे. आत्ताचे स्ट्रक्चर आहेत यावरूनच पूर्वीच्या काळी हे किती भव्यदिव्य असेल त्याची कल्पना येते. इथली राणी रूपमती आणि बाझ बहादुर ची प्रेम कथा प्रसिद्ध आहे. आम्ही एक गाईड केलेला त्याने सांगितलेल्या स्टोरीचे सार असे की मांडू जवळ धरमपुरी म्हणून एका गावी राणी रूपमती राहत होती. तिचे लग्न ग्वाल्हेरचा राजा मानसिंग सोबत झाले. पण राणी रूपमती चा रोजचा नेम होता की नर्मदा मैया ची पूजा करून ती अन्नग्रहण करत असे. ग्वाल्हेर च्या आसपास कुठेही नर्मदा नव्हती त्यामुळे तिचे रोजच उपास घडायला लागले. त्यामुळे कंटाळून राजा मानसिंग ने तिला धरमपुरी ला परत पाठवले. त्या काळी मांडू चा राजा बाज बहादुर होता तो शिकारीसाठी दूर दूर जात असे. असेच एकदा तो धरंपुरी प्रदेशात शिकारीसाठी गेला तेव्हा रूपमती गाणे गात होती आणि आकाशात ढग नसताना देखील पाऊस पडायला लागला कारण ती मेघमल्हार गात होती. बहादूरलाही संगीतात फार रुची होती त्यामुळे तो रूपमतीला मांडूला घेऊन आला आणि रूपमती ला जहाज महल मध्ये ठेवले. आता रूपमतीचा जो नियम होता नर्मदेचे पूजा किंवा दर्शन केल्याशिवाय अन्नग्रहण करायचे नाही त्यासाठी बाज बहादूरने रूपमती पॅव्हेलियन बनवला. तेथील मनोऱ्यावर उभे राहून दूरवर नर्मदामैया चे दर्शन होत असे. पण तो काळ तसा अस्थिर होता. काही वर्षांनी बाज बहादूर लढाईसाठी राजस्थान कडे निघून गेला. इकडे मांडूवर कुठल्या राजाने आक्रमण केले. तेव्हा राणी रूपमतीने आत्महत्या केली.

जहाजमहाल

20211205_105448.jpg

Screenshot_20211218-131233_Gallery_0.jpg

पावसाचे पाणी वाहून नेऊन जमा करण्याची खास रचना
20211205_104426.jpg

राणी रूपमती पॅव्हेलियन

20211205_120508.jpg

Screenshot_20211218-132650_Gallery.jpg

मांडू चे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे बाओबाब झाडे. मराठीत गोरखचिंच. मांडूमध्ये जिकडे तिकडे ही झाडे दिसतात. अतिशय मोठे खोड आणि पानं नसलेल्या फांद्या. यांचे फळ असते त्याला मांडू की इमली असे म्हणतात. फार पूर्वी आफ्रिकेतून या झाडांच्या बिया आणून इकडे लावल्या गेल्या.

Collage 2021-12-05 14_04_13.jpg

मांडू बघून झाल्यानंतर आम्ही जवळच असलेल्या महेश्वर ला गेलो. वेळ अगदी कमी असल्याने फक्त नर्मदा नदीवरचा महेश्वरचा घाट तेवढा बघण्याचे ठरवले. अतिशय अप्रतिम कलाकुसर असलेले देऊळ, घाट बघण्यासारखे आहे. फोटोतून याची प्रचिती येईलच.

20211205_154501.jpg

20211205_154050.jpg

20211205_155910.jpg

20211205_153628.jpg

20211205_155945.jpg

यावेळी महेश्वरी साड्या वगैरे शाॅपिंग करायला वेळ मिळाला नाही. त्यासाठी पुढच्या वर्षी पुन्हा जाऊ :)
प्रवासवर्णन पहिल्यांदाच लिहीत आहे. सहसा इंदोर साईडला कोणी फारसे ट्रिपला जात नाहीत. पण इकडे तीन चार दिवसांची मस्त सहल होऊ शकते हे सांगण्यासाठी हा लेखनप्रपंच.

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle