माझी सिंगापूर सफर भाग २ ( zoo)

ठरवल्याप्रमाणे दूसर्‍या दिवशी हॉटेल मध्ये Breakfast करुन Singapore zoo बघायला गेलो. हा झू सिंगापूर च्या Rainforest मध्ये २८ हेक्टर ईतका पसरलेला आहे. झू मध्ये विवीध विभाग आहेत जसे की Wild Africa, Reptile garden, Australian zone, etc. Map घेऊन तुम्ही सुरवात कुठून करायची ते ठरवु शकता. ईथे पण फिरायला ट्राम आह्ते तरी पण खुप चालायला लागते. झू चे एक वैशिष्ट्य कि सर्व प्राणी त्यांच्या नैसर्गिक वातावरणात आहेत कुठेहि पिजरे, जाळ्या नाहित.
सुरवातीलाच चिंपांझी झाडांवरुन ऊड्या मारताना, कसरती करताना दिसले, त्यांना असे चाळे करता यावेत म्हणुन कदाचीत मोठे मोठे दोर झाडांवर बांधलेले दिसतात त्यामुळे त्यांना हवे तीथे फिरता येते. हि कल्पना मला खूप आवडली.
तीथेच पुढेच आम्ही मुंगुसा सारखा दिसणारा पिवळ्या रंगाचा कधी न बघीतलेला प्राणी बघीतला. असे बरेच न बघीतले ले प्राणी बघयला मिळाले.
अगदी polar bear, puma, jaguar, sea lion, kangaroo , ourang outang etc. आपले वाघ, हत्ती , सिंह, गेंडे, पण आहेत. आम्हि चित्ता बघत असतानाच पाउस सुरु झाला, बंर सिंगापूर मध्ये पाऊस कधीही पडतो, छ्त्री असली तर बरे, आमच्याकडे छ् त्री नव्ह्ती मग काय एक शेड होती त्यात ऊभे राहिलो, त्याला काच होती काचेच्या एका बाजुला चित्ता तर दुसर्या बाजुला आम्ही एकमेकांना बघत पाऊण तास ऊभे होतो. सुरवातीला भीती वाटत होती पण थोड्यावेळाने एकमेकांना बघुन भीती कमी झाली. बरं रस्त्याच्या दुसर्या बाजुला गेंडे आणि झेब्रे पाऊस संपताच हूश् झाले. आणि पुढचा प्रवास सुरू झाला.
Reptile garden मध्ये वेगवेगळ्या आकाराचे आणि रंगांचे साप, सरडे, अजगर, कासव आहेत. साप,सरडे मला किळसवाणे वाटतात म्हणुन मी लवकरच काढता पाय घेतला तर पुढे स्वागताला ऊरांग ओटांग, माकडाच्या जातीचा हा अजस्त्र प्राणी झाडांवर सहज ऊड्या मारतो. Lunch with Orangutan करता येते, पण आम्ही झू मधल्याच एका Restaurant मध्ये आपआपले जेवलो.
Australian zone मधे कांगारू बरोबरच koala नावाचा अतिशय गोंडस प्राणी बघीतला. हा प्राणी दिसायला आपल्या soft toys सारखा दिसतो असं वाटते त्याला हातात घेऊन कुरवाळावे. हा प्राणी अतिशय थंड हवेत राहत असल्यामुळे त्याला A.C Dome मध्ये ठेवले आहे.
नंतर तुम्ही Underwater world बघायला जाता. अवर्णनीय असं समुद्रा खालंच जंग अनुभवता येते. kung fu Panda या
चित्रपटातील पांडा प्रत्यक्ष बघता आला. आणि या सगळ्य्याबरोबर चुकवु नये अशी Amazon River Quest ride. १५ ते २० मिनीटाची बोट राईड करायलाच हवी. River safari ride पण आहे त्यात थोडावेळ बोटींग करता येते आम्ही ते केल नाही. हे सगळ बघता बघता झू बंद व्हायची वेळ झाली मग taxi करुन हॉटेल वर परतलो.
आजचा दिवस लवकर संपल्यामुळे Orchard Road वर window shopping केले. ईथे तुम्हाला जगभरातले सगळे Fashion Brands दिसतात. दीवाळी असल्यामुळे ईथल्या रस्त्यांवर पण खुप रोषणई केली होती. बरच हिंडल्यावर तीथेच एका food joint मध्ये जेवुन हॉटेल वर परतलो.

ऊद्या Sentosa Island

फोटो :
Cheetah
DSC02327.jpg

Orangutan
DSC02354.jpg

koala
DSC02364.jpg

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle