माझी सिंगापूर सफर भाग ३

आजचा सिंगापूर मधला तिसरा दिवस, आज Sentosa Island. Sentosa Island म्ह्णजे भरपूर Activity नी भरलेला दिवस. ईथे तुम्हला तुमचे ई-तिकीट convert करायला लागते. Sentosa Island मध्ये तुम्ही ट्राम, मोनो रेल आणि केबल कार वापरु शकता. केबल कार चे वेगळे तिकीट घ्यावे लागते, त्यात पण २ पास आहेत १- Mount faber Line, 2-Sentosa Line आम्ही sentosa line चा unlimited ride चा पास काढला होता. केबल कार चा पास जरूर काढावा. मोनो रेल आणि केबल कार ची वेगवेगळी स्टेशन आहेत मॅप मध्ये बघुन त्या त्या स्टेशन वर जाउन तिथल्या Activity तुम्ही करु शकता. Sentosa Island मध्ये पण बरीच हॉटेल आहेत काहीजण तिथल्याच हॉटेल मध्ये राहुन sentosa and Universal studio बघतात. Sentosa चा २० Rides चा पास काढला होता, दिवसभरात तितक्याच होतील अस वाटल म्ह्णुन, एखादी दुसरी राईड आवडलीच तर तिथे तिकीट काढुन करु असे ठरवले.

सुरवात आम्ही सिंगापूरचे प्रतीक असलेल्या Merlion केली. सिंहाच तोंड आणि मास्याचे शरीर असलेल्या या पुतळ्यात तुम्हाला सिंगापूर नाव कसे पडले याची १० मिनिंटाची video clip दाखवतात. नंतर तुम्ही lift ने सिंहाच्या डोक्यापर्यत जाउ शकता तिथुन तुम्हाला पूर्ण sentosa दिसते. सिंगापूर शहरातील पुतळ्यापेक्षा हा खुपच मोठा आहे. मग आम्ही मुलाने youtube वर बघुन list down केलेल्या राईड करायचे ठरवले. Skyline Luge ride मधे तुम्हाला केबल कार मधुन ऊंचावर घेऊन जातात. वरुन खालपर्यत Gokarting सारखा जंगलातुन मस्त track बनवलेला आहे तीथुन Kart चालवत खाली यायचे खुप मजा येते.

DSC02406.jpg

ज्यांना हार्ट चा किंवा बी.पी चा प्रोब्लेम नाही आणी ज्यांना थ्रील अनुभवायच आहे अशांनी Mega zipline ride करावीच. यात आपल्याला २४६ फूट ऊंचीवर घेउन जातात आपण एका दोरीला लट्कुन ६०किमी प्रती तास वेगाने ४५० मीटर प्रवास करतो. आपला प्रवास जंगला वरुन सुरु होउन समुद्रकिनारी संपतो, अतिशय रोमांचक अनुभव आहे. sentosa तील Tiger sky tower पण जरुर बघावा यात आपण लीफ्ट ने जवळपास ३६ व्या मजल्याव र जातो तीथुन singapore skyline खुप छान दीसते.
या सर्व राईड बरोबरच तुम्ही तिथे 4D शो पण बघु शकता , ४ शो आहे त आम्ही २ बघीतले. याशिवाय Butterfly garden, underwater word, बघायलाच पाहीजे असे Madame Tussauds wax museum . मेणाचे पुतळे कसले, खरीच माणस
वाटतात अप्रतिम! दुसरा शब्द नाही.

SL380752.jpg

DSC02426.jpg

sentosa मधले रात्रीचे आकर्षण Wings of Time show. याचे १ तासाचे २ शो आहेत. मला तर याचे शब्दात वर्णन करताच येणार नाहि. डोळ्यांच पारणं फेडणारा पाण्यावरचा लेझर शो. तुम्ही youtube वर याचा video बघु शकता. अवर्णनीय शो बघुन sentosa मधुन बाह्रेर पडलो. दोन दिवस पिझ्झा, पास्ता खाउन कंटाळल्यामुळे आज Indian food खाण्यासठी clarke quay रोड वर रास नावाच्या हॉटेल मधे गेलो. clarke quay रोड खुप street food joints आहेत, Non-veg खाणा-याना खुप options आहेत पण आम्ही vegetarian अ सल्यामुळे limited option होते. Indian food साठी तुम्ही Novotael मधे mughal darbar ,Holiday inn मधे tandoor restaurants मधे जाउ शकता पण ही थोडी महाग पण छान आहेत. अन्नलक्ष्मी restaurant आहे जिथे तुम्ही जेवल्यावर तुमच्या ईछ्ये प्रमाणे पैसे द्यायचे ते बिल देत नाहीत, आम्हाला ते विषेश आवडले नाही. सिंगापूर मधे Little India नावाचा area आहे तीथे indian food joints आहेत, तिथला mustafa mall बद्द्ल ऐकलं होत म्हणुन गेलो पण फारच निराशा झाली, आपल D mart बस्स ईतकंच म्हणेन.

चौथा दिवस Universal Studio म्ह्णजे रोमांचक, थरारक राईड्स आणि सुरेख landscaping. ईथे पण तुम्हाला तुमच e-ticket convert करायला लागतात. Universal मधे २ express pass available आहेत universal express (यात तुम्ही queue skip करुन १ राईड एकदाच करु शकता) तर universal express unlimited (यात तुम्ही queue skip करुन १ राईड कितीही वेळा करु शकता) हा पास तिकीटा व्यतिरीक्त जादा पैसे देउन घ्यावा लागतो. आम्ही गेलो त्यादिवशी खुप गर्दी होती आणि नव-याला रांगेत ऊभ रहायचा कंटाळा म्हणुन आम्ही universal express पास काढला.
Cylon vs Human नावाची अतिशय भयंकर राईड (ज्यात २,३ वेळा तरी ३६० डीग्रीत उलट सुलट फीरवतात) मुलाने आणि
नव-याने केली. अशाच भयंकर Revenge of the Mummy (अंधारतले Roller coaster, जे एका क्षणी थांबेल असे वाटत असतानाच ऊलट फिरते, भयंकर!), Transformers सारख्या राईड केल्या.

DSC02507.jpg

Madagascar, Jurassic park rapid adventure rides खुप छान आहेत कोणीही करु शकतात. ईथे खुप राईड्स आणि फीरण दोन्ही होतं.Universal मधे नुसतच फिरायला पण खुप मजा येते. दिवस कसा संपतो कळतच नाही. खुप दमलो होतो म्ह्णुन मग तिथेच खाउन हॉटेलवर परतलो.
आम्ही क्रुझ वरुन परत आल्यावरचा दिवस सिंगापूर city tour करता राखीव ठेवला होता. city tour तुम्हाला बसचा 1 day Hopper pass काढुन फीरता येते. या hop on hop off open बसमधुन फिरायला मजा येते.
सिंगापूरची मुख्य Attraction Singapore flyer ( जे London eye सारखे आहे. ), Merlion, Gardens by the bay, Marina bay sands hotel etc.

Gardens by the bay एक Nature park आहे. ईथे जगातल मोठ काचेच ग्रीन हाउस आहे, या AC Flower dome मधे जगभरातील विवीध फुलझाडे बघायला मिळतात. रंगीबेरंगी फुल त्यांचे नैसग्रिक रंग, तीथुन बाहेर पडावसंच वाटत नाही. खुप प्रकारचे निवडुंग आणि बांबु पण आहेत. ईथल्या clouds dome मधे मानवनिर्मीत waterfall आहे पण आम्हाला तो बघता आला नाही, maintenance करता बंद होता . या पार्क मधे स्टील चे झाडाच्या ऊंचीचे टॉवर बाधले आहेत ज्यावर वेली आणि लाईटच्या माळा सोडलेल्या आहेत, रात्री ईथे Light show असतो इथुन जवळच Marina bay sands Hotel आहे. ५५ मजल्यांचे ३ टॉवर असलेल हॉटेल १ हेक्टर roof terrace ने जोडले आहे. ३ टॉवर वर एक मोठे शीप ठेवल्या सारखे दिसते.
ईथल्या ५६ व्या मजल्यावर viewing desk आहे त्याचे तिकीट (gardens by the bay च पण) city tour मधे काढता येते. रात्री viewing desk वरुन सिंगापूर खुप छान दिसते. viewing desk च्या वरती Infinity swimming Pool आहे. या हॉटेल मधे shopping malls, largest atrium casino पण आहे.

Garden by the Bay

DSC02906.jpg

DSC02941.jpg

DSC02966.jpg

Marina Bay Sands, Hotel

DSC02962.jpg

Singapore Sky Line From Marina Bay Sands

DSC02991.jpg

DSC02997.jpg

पुढील लेख क्रुझची सफर.......

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle