काझीरंगा - मेघालय सहल दिवस - १ - काझीरंगाला पोचलो

गेली २ वर्षे घरात बसून काढली. त्यामुळे तिसरी लाट ओसरायला लागल्यावर सहलीला जाण्याचे वेध लागले. मला कधीपासून काझीरंगाला जायचं होतं. १ मे ला ते बंद होतं त्यामुळे एप्रिलमधे जायचं ठरवलं. आसाम बरोबर मेघालय करण्याचं ठरवलं. अजून एक मित्र-मैत्रीण कुटुंब पण बरोबर होते.

मग सुरू झाली सहलीची तयारी. सुट्ट्या टाकून दिल्या आणि मग सुरू झालं प्लॅनिंग. कुठे किती दिवस घालवायचे, काय काय बघायचं ह्यासाठी गूगल हाताशी होतचं. इ त के ब्लॉग्ज, व्लॉग्स बघितले की न जाताही सगळ्या ठिकाणांची खडानखडा माहीती गोळा झाली. ४-५ वीकांत चर्चा करून प्लॅन ठरला. मग हॉटेल, विमान, टॅक्सी बुकिंग्ज पार पाडली.

दिवस १ - पुण्याहून निघून विमानाने गुवाहाटी, तिथून काझीरंगा
दिवस २ - काझीरंगा सफारी
दिवस ३ - काझीरंगाहून निघून शिलाँग
दिवस ४ - शिलाँगच्या आसपास फिरणे
दिवस ५ - चेरापुंजी दर्शन करून चेरापुंजीला स्टे
दिवस ६ - डबल डेकर रूट ब्रिज ट्रेक
दिवस ७ - चेरापुंजीहून निघून दावकी, स्टे मॉलिन्लाँगला
दिवस ८ - क्रँग सुरी धबधबा करून गुवाहाटीला परत
दिवस ९ - गुवाहाटीमधे फिरणे, रात्रीच्या विमानाने परत

दिवस १ -

पुण्याहून पहाटे २:५५ च विमान होतं. विमान वेळेत गुवाहाटीला पोचलं. टॅक्सीवालाही वेळेच्या आधी एअरपोर्टला हजर झाल्याने ७ च्या आधी काझीरंगाला जाण्याचा प्रवास सुरू झालेला. विमानात खास झोप न झाल्याने सगळ्यांच्या विकेटस पडल्या आणि ९ च्या सुमारास चालकाने एका हॉटेलपाशी थांबवल्यावर सगळे उठलो. आम्ही पोचलो तो दिवस बिहुची सुरुवात होती त्यामुळे वाटेतल्या गावात आसामी पोषाखातल्या मुली, बायका गावागावात दिसत होत्या. वाटेत एक मोठ शिवलिंगाच देवालय दिसलं.

ह्या पाणपक्षाचं मोठ्ठ घरटं वाटेत लागलं -

pakshi1.jpeg

हे ते शिवलिंगाच्या आकाराचं देऊळ -

shivtemple.jpeg

दुपारी ३ च्या सुमारास हॉटेलवर पोचलो. आवरून जवळच्या एका गावात गेलो. तिथे एका घरात लहान मुली छान डान्स करत होत्या. त्यांच्या घरच्यांची परवानगी घेऊन फोटो काढले -

bihu1.jpeg

५ आणि ६ वर्षाच्या मुली न लाजता नाचत होत्या. इतकं लहान गाव, प्रत्येक घरापुढे भाजीपाला लावलेला. १-२ मासेवाले कोपर्यावर बसलेले.

दुसर्या दिवशीची जीप सफारी बुक करून झोपलो. हा हॉटेलचा रात्रीचा फोटो -

wildernest2.jpeg

wildernest1.jpeg

दिवस २

Keywords: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle