रेड क्रीमी सॉस पास्ता

आजची खादाडी धाग्यावर फोटो टाकला त्या पास्त्याची ही रेसिपी. मूळात मी पास्ता फार करत नाही, शक्यतोवर नवर्‍यालाच करायला लावते. मी एक ग्रीन सॉस बनवून करते सृजन साठी आणि काही वेळा रेडीमेड बेसिल पेस्तो वापरून. काल भलत्याच चार रेसिपी बघून नंतर त्यापेक्षा वेगळीच मला जमेल अशी रेसिपी केली आणि छान जमला. काहीं घटक अंदाजे किती घातले असतील ते आठवून लिहीलं आहे, सगळं अगदी काटेकोर नाही.

साहित्य -
पास्ता - मी होल व्हीट पास्ता वापरते, पेने होता घरात तो घेतला आहे, आणि तिघांसाठी साधारण अडीच कप घेते.

सॉस साठी - एक कप दूध, पाव ते अर्धा कप कणिक (किंवा मैदा), चीज किसून - इथे एमेनटालर (Emmentaler) वापरलं आहे, हेही साधारण एक वाटीभर तरी असेल, इतरही चीजचे प्रकार चालतील. मीठ.

भाज्या - एक मध्यम आकाराचा कांदा, दोन लसूण पाकळ्या, दोन रंगाच्या सिमला मिरची, कोथिंबीर, चाइव्ह्स, टोमॅटो पेस्ट, फ्रेश बेसिल, ऑलिव्ह ऑइल, ओरिगानो, थाइम, मीठ, मीरपूड. चेरी टोमॅटो नव्हते घरी, असतील तर उत्तम.

कृती
भाज्यांची तयारी -
एका पॅन मध्ये ऑलिव्ह ऑइल गरम करून त्यात उभा चिरलेला कांदा परतून घ्या, त्यातच अगदी बारीक चिरलेला लसूण पण परता. मग सिमला मिरची घाला. मूठभर बारीक चिरलेली कोथिंबीर, चाइव्ह्स, मीठ, मीरपूड, ड्राइड थाइम, ओरेगानो घाला. मग टोमॅटो पेस्ट घाला. सगळं नीट परतून घ्या. कांदा पूर्ण शिजलेला तर सिमला मिरच्या थोड्या क्रंची असं मला आवडतं. (ब्रोकोली, गाजर अश्याही भाज्या घेता येतील, फक्त त्याप्रमाणे शिजण्याचा वेळ बदलेल. किंवा आधी स्टीम करून मग त्या फक्त यात शेवटी परतायच्या. )

पास्ता शिजवणे -
पास्त्याच्या पाकिटावर दिलेल्या सूचनेप्रमाणे पास्ता al dente शिजवून घ्या. तो चाळणीत काढून त्यातलं पाणी पण ठेवा, ते नंतर वापरता येतं.

एका भांड्यात बटरवर हळूहळू कणिक/मैदा घालून परतत राहा. मग थोडं दूध, पुन्हा थोडी कणिक/मैदा मग दूध असं टाकत स त त ढवळत राहा, अजिबात गुठळ्या व्हायला नकोत. कणिक नीट शिजली की मग चीज घाला, गरजेप्रमाणे मीठ पण घाला. त्यातच आता पास्ता आणि भाज्या सगळं घाला आणि फ्रेश बेसिलची पानं इथे चुरडून घाला. हा व्हाइट सॉस आणि भाज्यांचा लाल सॉस मिळून पिंक शेड दिसायला लागेल. खूप घट्ट वाटला तर पास्त्याचं पाणी थोडं थोडं घालून हवी ती कन्सिस्टन्सी आणा, गॅस बंद करा आणि सर्व्ह करा.

PXL_20230214_174956581.jpg

पाककृती प्रकार: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle