चेरी जॅम

गेल्या आठवड्यात नवर्‍याने भरपूर चेरीज आणल्या आणि नंतर घरी आलेल्या एका मैत्रिणीने सुद्धा खूप चेरीज दिल्या. इतक्या नुसत्या खाऊ शकणार नाही, म्हणून मग आईने जॅम केला. तिने पण युट्यूब वरच्या बर्‍याच रेसिपीज बघून त्याप्रमाणे केला.

साहित्यः
चेरीज - ५०० ग्रॅम. (न चिरलेल्या एवढ्या, बिया काढून टाकल्या नंतरचं वजन केलं नाही )
साखर - पाऊण कप
लिंबाचा रस - २ टेबलस्पून

पहिलं काम चेरीज धुवून सगळ्या बारीक चिरून घेणे, सगळ्यातल्या बिया काढून घेणे. हे फार मोठं काम वाटलं (मला), पण आईनी विळीवर अगदी निगुतीने केलं.
ते झालं की या चेरीज आणि साखर एका भांड्यात एकत्र करून मध्यम आचेवर शिजवायला ठेवायच्या. हळूहळू साखर विरघळून ते एकजीव होऊ लागेल. मग त्यात लिंबाचा रस घालायचा. साधारण १०-१२ मिनीटांनी चमच्यात घेऊन कन्सिस्टन्सी चेक करायची, चमच्यातून ताटलीत घेतल्यावर पातळ ओघळ यायला नको, पण खूप घट्ट नको. दोन तारी पाक असतो तसा. मग गार झाल्यावर बरणीत भरून ठेवायचा.

Cherry Jam

पाककृती प्रकार: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle