उपासाचे गुलगुले

उपासाचे गुलगुले:
नमस्कार मंडळी:
सध्या विणकाम तोरणं, रुमाल बाप्पाच्या स्वागतासाठी रोजच चालू आहे! त्यामुळे कामात बदल हवाच ना..माझ्या डोक्यात एक तर क्रोशाचं डिझाईन येतं किंवा पाककृती!त्यापैकी जे जास्त भुंगा लावील ते करायचं!

साहित्य: केळ्याचं पीठ 1 वाटी, गूळ अर्धी वाटी, शिजलेला भोपळा कुस्करून अर्धी वाटी, ओलं खोबरं पाव वाटी( याशिवाय रेसिपी पूर्ण होतच नाही), पाणी अर्धी वाटी, वेलची पावडर , मीठ, आलं एक टीस्पून किसून, तेल तळण्यासाठी ( खात असाल उपासाला तर घ्या)
कृती: अर्धी वाटी पाणी आणि गूळ एकत्र करून गूळ नीट विरघळवून घ्या. ( मी भोपळा वाफवताना जे पाणी त्यात घातलं तेच गाळून घेऊन गुळात घातलं) यात 1 वाटी केळ्याचं पीठ, शिजवून कुस्करून भोपळा, ओलं खोबरं,मीठ चवीपुरतं आणि आलं घालून पीठ छान फेटून घ्या. दहा मिनिटं तसंच झाकून ठेवा.
20190322_174902minalms.jpgकढईत तेल तापत ठेवा. तेल तापलं की त्यातलं दोन चमचे गरम तेल या तयार पिठात घाला. वेलची पावडर घाला.
पीठ परत फेटून घ्या. पीठ भज्यांच्या पिठाइतपत हवं. बघून लागलं तर पाणी घाला. छोटे छोटे गुलगुले मंद ते मध्यम आचेवर तळून घ्या. 20230826_195456.jpg
बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ असे मस्त गुलगुले तयार आहेत.
20230826_195653.jpg

टीप: पिठात तेल नको असेल आणि उपासाला चालत असेल तर सोडा घालू शकता.
केळ्या ऐवजी कणिक घेऊन पण बिन उपासाचे गुलगुले छान होतात, कणकेत मी चमचाभर रवा घालते.
मीनल सरदेशपांडे

पाककृती प्रकार: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle