थालीपीठ - एकपात्री खाद्यप्रयोग अर्थात वन डिश मील

थालीपीठ हा खूप आवडता खाद्य प्रकार. लहानपणा पासून. विविध वरायटी मध्ये बनू शकणारा. कांद्याचे बेसिक, पातीचे, मेथीचे, उरलेल्या वरणाचे. उरलेल्या पदार्थांचे तर अक्षरश कशाचेही करता येतेच. त्यातले बटाटा किंवा वांग्याच्या भाजीचे especially मस्त लागते.
मला जरी खायला आवडतं असला तरी दर वेळी माझं थालीपीठ छान जमतं च असं नाही. आईचं कसं हुकमी आतून मऊ आणि वरून कुरकुरीत असं चविष्ट खमंग बनतं ते काय मला खात्रीपूर्वक जमेना.
त्यातून +१ ला भाजणीचे with कांदा आणि कोथिंबीर हेच कॉम्बो आवडते. इतर गोष्टी म्हणजे भेसळ किंवा जुगड म्हणून त्याचा सक्त विरोध. त्यामुळे खरं हा मस्त जेवण प्रकार असून फार वेळा करता येत नाही
अगदी केलीच थालिपीठं जेवायला तर मी दोन वेगळे गोळे मळते. एक classic आणि एक पौष्टीक ( इतर वस्तू add केलेलं)
तेही मागं एकदा खुसखुशीत कुरकुरीत न होता कडक झालं. तेंव्हापासून माझा कॉन्फिडन्स गेला होता.
मग मध्ये एकदोनदा भाजणीची धिरडी करून पाहिली ब्रेफाला तर बरी लागली. मग निदान मला माझी एकटीची सोय करायची असेल तेंव्हा मी हे करायला लागले.
एक traveller मुलीचं reel बघताना तिने प्रवासात मिळालेली गाजर आणि झुकिनी आणि पालक घालून केलेली धिरडी) चीले दिसले. पीठ कमी आणि भाज्या जास्त.
तर आज एकटीने जेवायचा मौका होता म्हणून मस्त पैकी हा प्रकार केला.
आता इथल्या सुगरणीना थालीपीठ ची कृती सांगायची गरज नाही खरं. पण हे माझ्यासाठीच केलेलं documentation म्हणता येईल.
भरपूर चिरलेली कोथिंबीर आणि तितकीच मेथी ( दोही मिळून साधारण दीड वाटी)
एक किसलेले मध्यम गाजर
थोडा चिरलेला कांदा ( से अर्धी वाटी)
लसूण आणि हिरवी मिरची ठेचून ( चार पाकळ्या, तीन मिरच्या)
थालीपीठ भाजणी ( दीड वाटी) सकस ची
एक चमचा तीळ
छोटा अर्धा चमचा ओवा
अर्धा चमचा जिरेपूड
एक चमचा धणेपूड
चिमुट भर हिंग
छोटा अर्धा चमचा हळद
मीठ
थोडं लाल तिखट

सगळं साहित्य कोरड हलक्या हाताने मिक्स करून घेतलं.
मग थोडं पाणी घालून भज्याच्या पिठाची कंसिस्टंसी आणली.
धिरड्यापेक्षा थोडं घट्ट.
मग तेल घालून उत्तपा घालतो तितकं जाड घातलं. आतल्या मसाल्यामुळे फार पातळ होणारच नव्हतं तसं पण. पहिल्या वेळी झाकण ठेवलं. उलटल्यावर बारीक गॅस वर झाकण न ठेवता.
मस्त पैकी दोन्ही बाजूंना खरपूस शेकलं.
एकदम हरवाळ चविष्ट प्रकार झाला.
मलाच पहिल्यांदा स्वतः केलेलं थालीपीठ आवडलं म्हणून हा शेयरिंग चा अट्टाहास.
img_20231014_134156-01.jpeg

पाककृती प्रकार: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle