तांबूल

याक विचारायचं होतं वर मंजूडीने तांबूल बद्दल विचारले. तिला पाक वापरून केलेला टिकाऊ तांबूल हवा आहे, तो नाही पण त्यानिमित्ताने आईला पाकृ विचारली. ती इथे देते आहे. मी हा तांबूल डीप फ्रीज मध्ये फ्रीजर सेफ पिशवीत हवाबंद असा ठेवला होता. महिनाभर छान राहिला.

मग इतरही पाकृ आणि प्रकार इथेच लिहू शकतो. मी नंतर हेडर मध्ये अपडेट करेन.

साहित्य -
आत्ता सगळ्याचं प्रमाण आईकडेही नव्हतं. पण पुढे पद्धत दिली आहे त्या पद्धतीने अंदाज येईल.

विड्याची पानं - २५
बडीशोप -
मसाला सुपारी -
सुका खोबर्‍याचा कीस -
लवंग -
वेलदोडे -
गुलकंद - २ मोठे चमचे
काथ -
चुना -
थंडाई - आवडत असल्यास

कृती -

पानाची देठं आणि टोकाचा लहान तुकडा काढून टाका.
५ पानं एकावर एक ठेवून घ्या. (२५ आहेत तर प्रत्येकी ५ ची एकेक गड्डी होइल असं). विड्याची पानं लावताना नेहमी उलटीबाजू वर घ्यावी. याला चुना, काथ लावून घ्यावा (फक्त वरच्याच पानावर लावलेला पुरतो. काथ उग्र असतो, तो थोडा चमचाभर दुधात मिसळून घ्यावा), प्रत्येक या गड्डीवर आता चम्चाभर सुपारी, खोबर्‍याचा कीस, बडीशोप, लवंग, वेलदोडे हे सगळं ठेवावं. हे असं करण्याचं कारण प्रमाण समजावं म्हणून.

आता हे सगळे कोरडे घटक काढून घेऊन मिक्सर मधून भरडसर फिरवून घ्यावे.
मग चुना-काथ लावलेल्या पानांचे कात्रीने तुकडे करून तेही वेगळे मिक्सर मधून थोडे फिरवून घ्यावे.
दोन्ही वेगवेगळे करण्याचे कारण म्हणजे टेक्स्चर, सगळं एकत्र केलं की फायनल प्रोडक्ट टेक्स्चर बदलतं, ते या प्रकारात जास्त चांगलं येतं.
आता हे दोन्ही एकत्र करून त्यात गुलकंद मिसळावा. मग पुन्हा सगळं एकदा मिक्सर मधून काढावं.

आवडत असेल तर थंडाई मिक्स करू शकता.

फ्रिज मध्येही ३-४ दिवस नीट राहतो.

पाककृती प्रकार: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle