घरच्या घरी गार्लिक/बटर नान

सुंदर बटर चिकन केले होते, मग त्याला जोडीला नान हवे वाटू लागले. घरीच करून पाहा असं सध्या आमचं चालू आहे. नवरा प्लंबिंग घरी करतोय म्हटलं आपण नान करून पाहू..
कुकविथमनाली नावाच्या ब्लॉगवरून पाहून केले. त्याची लिंक खाली आहे. हे माझे तिच्या रेसिपीचे मराठी/बस्केकरण. :)

साहित्यः

• ३-सव्वा तीन कप्स ऑल परपझ फ्लार किंवा मैदा.
• १ टिस्पून मीठ
• १ कप कोमट पाणी
• १ टेबलस्पून साखर
• २ टीस्पून active dry yeast
• 1/3 कप कोमट दुध
• 2 टेस्पू दही
• 3 टेस्पू तेल.
• लसणाच्या पाकळ्या ठेचलेल्या. (कितीही घ्या. मोर द बेटर.)
• 3 टेस्पू बटर
• कोथिंबीर चिरून

कृती:

१. मैदा व मीठ नीट मिक्स करून चाळून घ्या.

२. कोमट पाण्यात साखर व यिस्ट घाला, थोड्यावेळ बाजूला ठेवा. ते मिक्चर फोमी, बबली दिसलं म्हणजे यिस्ट अ‍ॅक्टिव्हेट झालं. मग त्यात कोमट दुध, दही व तेल घाला. आत्ता लिहिताना लक्षात आले की मी दुध दही साफ विसरले घालायला पण माझे नान चांगले झाले. :)

३. मैदा-मीठ वरील मिश्रणात हळूहळू एकत्र करा व कणिक तिंबा. यात मळायच्या आधी लसणाच्या पाकळ्या पण घालता येतील.

४. गोळा चिकट असेल खूप ड्राय करू नका. पण साधारण मऊसर दिसायला लागला की बोलमध्ये उबदार जागी ठेऊन द्या.

५. मी मावेत कॉफी केली मग त्यात हा बोल झाकून ठेऊन दिला तास दिड तास.

६. दिड-दोन तासाने पाहिल्यास गोळा थोडा फुगलेला दिसेल. आयडियली दुप्पट होईल माझा झाला नाही( कारण बहुधा मी दुध दही विसरले.) पण साईझ वाढला होता. त्याला बारीक चापट्या मारून हवा काढून घ्या.

७. वर दिलेल्या मापात ८गोळे होतील मी जरा कमी प्रमाण घेतले होते त्यामुळे त्या कणकेचे ५गोळे झाले. ओलसर पेपर टॉवेलने ते झाकून ठेवा.

८. गार्लिक नान करायला बटर तापवून त्यात लसूण कोथिंबीर घालून ते तयार ठेवा. मी गार्लिक बेसिल बटर विकतचे लावले.

९. तवा तापवत ठेवा. एक एक गोळा लाटताना लाटण्याला तेल लावून ओव्हल शेपमध्ये लाटा. यिस्टमुळे आकार सारखा पूर्ववत होत राहतो. तेव्हा जरा जोरात लाटून, पोळपाटाला चिकटलेला नान काढताना तो अजून लांबट होतो, तो तसाच्या तसा तव्यावर टाका. दोन्ही साईडने नीट भाजा. मी थोड्यावेळ गॅसवर पण धरलं त्याला. मस्त स्मोकी फ्लेवर आला. वरून गार्लिक बटर लावले.

चापा! Wink

img_7267_0.jpeg

img_7269.jpeg

न्युट्रिशन इन्फो तिच्या ब्लॉगवरून-

NUTRITION
Serving Size: 1 serving
Calories: 295 kcal
Fat: 10 g
Saturated Fat: 3 g
Cholesterol: 12 mg
Sodium: 339 mg
Carbohydrates: 42 g
Fiber: 2 g
Sugar: 2 g
Protein: 7 g

SOURCE URL
https://www.cookwithmanali.com/restaurant-style-garlic-naan/

पाककृती प्रकार: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle