ब्रिटनवारी - भाग १ पूर्वतयारी आणि तोंड ओळख

कोणी आपल्याला विचारले कि तुझी आवडती जागा कोणती, तर आपण जे पटकन नाव देतो, तिथे काही खास आहे म्हणून नाही तर आपल्या सगळ्या आठवणी तिथेच अडकलेल्या असतात म्हणून. आपण त्या आठवणींना त्या जागे पेक्षाही जास्त महत्व देतो. जसे जसे आपण मोठे होतो तश्या त्या जागाही बदलत राहतात.

हीच गोष्ट शाळेची, कॉलेजची. आपल्याला आपलीच शाळा/ कॉलेज नेहमी दि 'बेष्ट' :cool: वाटते. ह्या आठवणींबद्दल आपण भरभरून बोलतो.

पण आज फक्त शाळा किवा कॉलेज पुरतं शिक्षण मर्यादित नाहीये. आजच्या विद्यार्थ्यासमोर पूर्ण जग आहे आणि इंटरनेटमुळे ते अजूनच जवळ आले आहे.

आणि त्यातही सगळ्यात बेस्ट हवे. चोइस असेल तर का नाही? पण हे बेस्ट आहे हे कोण ठरवणार? मानांकन असले तर मला ते आवडेलच का? तिथे खरच कसं शिकवत असतील? हे एवढे फोटो आहेत कि खरेच आहेत का?

असे भरपूर प्रश्न असतात. मग शोध घ्यायला सुरुवात होते. ओळखीतले लोक त्यांचे अनुभव सांगतात पण प्रत्येकाचा अनुभव वेगळा असतो.

मग म्हणून शेवटी मी ठरवले कि मीच जाणार आणि मीच बघणार बाहेर काय आहे.

ह्या सगळ्याची सुरुवात गेल्यावर्षी (हो. बरोब्बर एक वर्ष!) झाली. माझे तेव्हा इतिहास, भूगोल आणि अर्थशास्त्र असे तीन विषय होते आणि एक चुळबूळ चालू होती कि अजून काहीतरी करायचं आहे. कोन्फरंस, सेमिनार्सन बसून फक्त माहिती मिळत होती आणि तेव्हाच ७५:२५ पद्धत सुरु झाल्याने प्रोजेक्ट्स सुद्धा बंद केले.

कोलेज मधून समजले कि सेंट झेविअर्सला रिसर्च मेथोडोलोजीचा एक कोर्स आहे. चौकशी केल्यावर समजले कि त्यांच्या रेनोवेशनमुळे सगळे शोर्ट टर्म कोर्सेस बंद केले आहे आणि नंतर तर हेच विषय बीएला असल्याने त्यांनी बाहेरच्या विद्यार्थ्यांसाठी सगळेच शोर्ट टर्म कोर्सेस कायमचेच बंद केले.

दुसर्या वर्षापर्यंत इतिहास आणि भूगोल दोघांची आवड होती पण दोन्ही मायनर केले असते तर पुढे अडचण येईल म्हणून नाही केले. रिसर्च मेथोडोलोजी नाही तर पुरातत्व शास्त्र होतेच. त्यात काही आहे का म्हणून सर्च केले तर आधी एक्स्ट्रा म्युरल च्या कोर्स ची माहिती मिळाली जो, एक वर्ष, दर रविवारी होता. खूप वाटल्यावर नेट वर शोधायला घेतले. नंतर वरदाताईंशी बोलल्यावर समजले कि तो कोर्स आवड असलेल्त्या लोकांसाठी आहे. मला मात्र त्या पेक्षा नक्कीच जास्त हवे होते. आवड होतीच पण hands-on हवेच होते. ह्या कोर्स मध्ये फिल्ड ट्रीप देखील होत्या. Oxbridge, डरहॅम, युसीएल अशी हि म्हणून यादी आली. सगळ्यांचे डीपार्टमेंट पेज पाहिले.

मला फक्त पुरातत्व शास्त्र शिकायचे नव्हते. त्यासोबत तिथला इतिहासही जाणून घ्यायचा होता. अश्यात डरहॅमच्या The Northern Borders of Empire to the Making of the Middle Ages (पुरातत्व शास्त्र + तिथला इतिहास) ह्या समर प्रोग्रॅम ची माहिती मिळाली. त्यांचा English Language for Academic Purposes हाही कोर्स बघितला आणि वाटले कि आधी हा कोर्से करावा. तिथल्या इतिहासापेक्षा किमान हि भाषा जवळची होतीच!

नंतर जेव्हा मेल-व्यवहार सुरु झाला तेव्हा बिलने (समर स्कूल ऑफिसर) इतिहासाचाच कोर्स करायचे सुचवले. भारत, टर्की असे अजून काही देशांतून येणाऱ्या विद्यार्थ्यांना IELTS द्यायची गरज नव्हती आणि मला तिथल्या Early modern (१५ ते १८व्या शतकातला काळ) PG बद्दल जाणून घ्यायचेच होते. लागे हाथ फॉर्म भरला, इथली कागदपत्र पाठवली (मार्कलिस्ट), कॉलेज मध्ये एचओडींची माहिती पाठवली (रेकामेंडेशन लेटर नाही लागले) आणि मार्च पर्यंत फी सुद्धा पाठवली.

२०१३ मध्ये सगळ्यात आधी पासपोर्ट बनवला होता. एवढ्या लगेचच शिक्का पडणार म्हणून तो आणि मी, आम्ही दोघंही खुश :party:

डरहॅमचे वैशिष्ट्य हे आहे कि Oxbridge सारखे हे सुद्धा युनिवर्सिटी टाऊन आहे. म्हणजे ते खेडंच त्या युनिवर्सिटीचे असते. साधी माणसं असली तरी जास्त शिकणारी असायची. सगळ्यात जवळचे "मोठे" शहर न्युकासल. त्यानंतर एडिनबर्ग, यॉर्क जी जवळची मोठी शहरं. २ रविवार त्यांनी मोकळे ठेवलेले जेणेकरून विद्यार्थी आजूबाजूला फिरतील. डरहॅमबद्दल सांगायचे तर भर मार्केट मध्ये दर ३-४ बिल्डींग नंतर युनिवर्सिटीचे कॉलेज किंवा डीपार्टमेंट असायचेच.

The Northern Borders of Empire to the Making of the Middle Ages हा कोर्स डरहॅम युनिवर्सिटीच्या Department of Archaeology आणि Institute of Medieval and Early Modern Studies चा आहे. ह्या मध्ये दोन आठवडे रोमन बिंचेस्टर (विनोविया) ह्या किल्ल्यावर उत्खनन करायचे होते आणि दोन आठवडे IMEMS तर्फे लेक्चर ठेवलेले. लेक्चर साठी पुस्तक आणि डरहॅम तर्फे २ हँडआउट दिलेले.

ह्यात साधारण इंग्लंडवर केलेल्या चार स्वारींचा (invasion) काळ शिकवला. मात्र हि फक्त तोंड ओळख होती.

सर्वात आधी
१. रोमन स्वारी AD 43 (रोमन बिंचेस्टर साईटवर आणि नंतर एका लेक्चर मध्ये ह्याची माहिती दिली आणि Peter Salway चे Roman Britain: A Very Short Introduction हे पुस्तक) मग

२. नॉरथमब्रियाचा थोडा इतिहास (David Rollason चे Northumbria, 500-1100: Creation and Destruction of a Kingdom हे पुस्तक, हे डरहॅम मध्ये प्रोफेसर आहेत) ह्यात Anglo-Saxon (mid 5th to early 7th AD ) स्वारीचा इतिहास त्या नंतर

३. ब्रिटनमध्ये आलेले Vikings (8th century) आणि शेवटी

४. 1066 AD Norman conquest of England (नॉर्मंडी मधून आलेले फ्रेंच)

ह्याशिवाय फक्त ब्रिटनच नाही तर पाश्चिमात्य देशांत पुरातत्व शास्त्र कसे शिकवले जाते, त्याची साधने काय, संवर्धन कुठे, कसे केले जाते ह्याची माहिती दिली. ह्या साठी Kevin Greene आणि Tom Moore यांचे Archaeology: An Introduction हे पुस्तक दिले.

तिथली एक अमेरिकन मैत्रीण नुकतीच मेक्सिकोहून असाच एक समर कोर्स करून आलेली आणि तिलाही हेच पुस्तक दिलेले.

माझ्यासोबत पहिल्या दोन आठवड्यांत १० जणं होती. ह्यामध्ये ६ जणं युएस फुलब्राईट स्कॉलर होते, ४ स्वतंत्र होते. शेवटच्या दोन आठवड्यात एक नवीन विद्यार्थी आला. ह्या सगळ्यांमध्ये दोघंच अमेरिकेच्या बाहेरचे होते . एक होते मी आणि दुसरा स्विस. आम्ही सगळे अंडरग्रॅड होतो - सगळे जवळपास दुसर्या तिसर्या वर्षातले होते.

इतिहास आणि पुरातत्व शास्त्र शिकायचे म्हणजे मला वाटले सगळे इतिहासाचे विद्यार्थी असतील. पण तसे अजिबात नव्हते. शिक्षण (एज्युकेशन), मानववंशशास्त्र, समाजशास्त्र, अभिजात (Classical Studies), साहित्य, भाषाशास्त्र असे विषय घेतलेलेही विद्यार्थी होते आणि बरेच जणं ऑनर्स कोलेजचे होते.

ऑनर्स कोलेज म्हणजे वेगवेगळ्या विषयांत प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांसाठी घेतले जाणारे लेक्चर किवा (interdisciplinary) उपक्रम (हेही मला एका अमेरिकन मैत्रिणीने सांगितले) ह्यात फक्त मार्कच नाही तर इतर सगळ्या गोष्टी धरून ती/ तो विद्यार्थी अजून कसा उत्तम आहे/ होऊ शकतो हे पाहतात. ह्यासाठी परीक्षा नसतात पण त्या विद्यार्थ्याची बुद्धिमत्ता आणि प्रगल्भता इतरांपेक्षा वेगळी आहे आणि ती अजून वाढवण्यासाठी हे उपक्रम घेतले जातात. ह्यात कम्युनिटी सर्विस, एक्स्चेंज, interdisciplinary स्टडीज सुद्धा असतात. अर्थात प्रत्येक शाळेचे निकष वेगळे असतात.

प्रत्येकाने काही ना काही पब्लिश केलेले. काही जणं घरातले पहिलेच ग्रॅज्यूएट होते, काही वेगवेगळ्या स्कॉलर क्लबचे हेड होते तर काही कमवा-आणि-शिका ह्या पद्धतीने शिकत होते. परत विषयांच्या combinations ला मर्यादाच नव्हती. साहित्यासोबत केमिस्ट्री, इंजिनियरिंग सोबत अर्थशास्त्र, भाषाशास्त्र आणि समाजशास्त्र, मिडिया (फिल्म) सोबत इतिहास. ह्यात त्यांच्या आवडीसोबत वेळोवेळी मिळणारे मार्गदर्शनही होते. ह्यातले ७ जणं RA म्हणजे Research Assistant होते तर तीघं Teaching Assistants होते.

ऐतेन असेच वाटले मला. इथे पहिल्यावर्षी प्रोजेक्ट होता तेव्हा आम्हाला भूगोलात सर्वे होता आणि सर्वेचा निकाल, त्याची मांडणी करून रिपोर्ट बनवायला शिक्षकांना अक्षरक्षः विनंती करावी लागायची. नंतर तर जे बसतील त्यांना ५ पैकी ५ मार्क देणार हे सांगितलेले. :heartbreak:

मी सोडले तर ह्या सगळ्यांनी काही ना काही अचिव्ह केलेले. लिखाण असेल किंवा कॉलेज तर्फे इतर आंतरराष्ट्रीय पातळींवर काम, अभ्यास, हे सगळे होते. त्यामुळे पुढे नेमके काय करायचे आहे, काय शिकायचे आहे , कश्यात संशोधन करायचे आहे, ह्या बदल ठाम होते आणि तेवढच नाही तर आपल्या सोबत जे आलेत ते काय शिकताहेत, पुढे काय करणार आहेत हेही जाणून घ्यायला उत्सुक होते.

हि गोष्ट फक्त विद्यार्थ्यांचीच नव्हती. आम्हचे लेक्चर घेणारे चौघंही असेच होते. त्यात तिघं UG शे शिक्षक होते आणि एक PhD ची विद्यार्थिनी होती. ती इंग्लंडची होती आणि UG पासून डरहॅम मध्येच आहे.

त्यांच्याकडून जेवढं ऐकायचे तेवढे कुतुहुलही वाटायचे आणि स्वतःबद्दल न्यूनगंड वाटायचा. ह्यांच्यासोबत मी एक आंतरराष्ट्रीय विद्यार्थिनी म्हणून खूपच मागे होते. जे एका अर्थाने बरही होतं कारण हा अनुभव न घेता मी मास्टर्सला गेले असते तर कदाचित मी माझ्या कॉलेजच्याच तळ्यात राहिले असते आणि खूप जास्त न्यूनगंड आला असता. माझ्या एचओडींशी हे बोलल्यावर त्यांनाही जरा वाईटच वाटले. पण त्यांचेही हात बांधले आहेत, त्यांच्यावरही बरेच निर्बंध आहेत. तरीही गेल्या २ वर्षांत त्यांनी archives आणि आमच्या लायब्ररीतून भरपूर जुनी पुस्तकं, ग्रंथ (बखरी, रानडे यांचे लेखन इ) आणून दिलेत. अभ्यासाला रेफ़रन्स असो किंवा नसो, ह्या गोष्टीन मुले अजून उत्तेजन मिळत गेले.

असो.

तर ५ जुलै ते ३० जुलै असा हा समरच्या सुंदर काळात हा कोर्स होता.

इथे ह्या कार्यक्रमाची, ह्या वर्षीची साधारण आउटलाईन दिली आहे. मी १८ आणि १९ जुलै लंडनला होते. त्या आधी ११ ला Hadrian's Wall, Housessteads Roman Fort आणि Vindolanda Fort पाहिले. १२ ला रविवारी आम्ही सगळे जण एकत्र एडिनबर्गला जाऊन आलो. ३ जणं आदल्या रात्री गेले आणि युथ हॉस्टेल वर राहिले. मी इतरांसोबत दुसर्या दिवशी सकाळीच गेले आणि रात्री परत आले. त्या नंतर २६ ला एकटीच Alnwick Castle आणि Garden ला जाऊन आले. माझ्यासोबतच्या सगळ्यांना यॉर्कला जायचे होते पण एडिनबर्ग सारखं हेही शहर पूर्ण बघायचा मोह झाला असता आणि पैसेही गेले असते. म्हणून मग Alnwick ला गेले. तिथे आम्हाला नेणार होते पण अचानक काही कार्यक्रमांमुळे (बहुतेक Downton Abbey चे शूट चालू होते) ते रद्द केले आणि त्या ऐवजी २५ ला शनिवारी लिंडसफार्न आणि Bamburgh Castle ला नेले.

मी ज्या दिवशी डरहॅमला पोचले तो शनिवार होता आणि त्यामुळे मला त्यांचे फार्मर्स मार्केट बघता आले. त्याच्याच पुढच्या शनिवारी आम्ही ११ ला हेड्रीयंस wall ला जाताना आणि येताना Miners' Gala ची झलक पाहिली. ह्यात सगळ्या युनिट्स/ समूहाचे ब्रास बॅंड आणि banner होते.

डरहॅम फोटो

Keywords: 

लेख: 

ImageUpload: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle