तुंगनाथ - देवरियाताल ट्रेक - भाग १

मागच्या वर्षी दहावी झाल्यावर शिरीनने एक ट्रेक केला, त्याची खरेदी करायला decathelon ला गेलेलो तेव्हाच मनात आलेलं पुढच्या वर्षी एक तरी हिमालयन ट्रेक करायचा. मार्चपासून foliage, युवाशक्ती वगैरे sites बघायला सुरुवात केली. सुट्टी मिळेल अशा तारखांमध्ये foliage चा फुलारा, तुंगनाथ आणि अजून एक बद्रीनाथ जवळचा ट्रेक बसत होता. माझ्या बालमैत्रिणीला विचारलं ती पण तयार झाली. मग foliage च्या ऑफिसला भेट दिली तर फुलारा ट्रेकला जायचं तर टेंटमध्ये राहावं लागणार होतो. ते कितपत जमेल म्हणून मग तुंगनाथ ठरवलं, त्याचं बुकिंग आलेलं होतं त्यामुळे ट्रेक कन्फर्म होता. पैसे भरले आणि तयारी सुरु केली.

बॅडमिंटन चालूच होतं, जसा वेळ मिळेल तसं सकाळ संध्याकाळ चालायला जायला सुरुवात केली. शनि-रवि एक दिवस तरी तळजाई. Foliage कडून माहिती द्यायला एक ऑनलाइन मिटिंग झाली 3 मे ला. छोटासा ग्रुप होता, 5 मुली आणि एक ग्रुप लीडर. मॉडरेट ट्रेक आहे, चालायची सवय ठेवा वगैरे सूचना मिळाल्या.

आणि 7 मे ला सकाळी ऑपरेशन सिंदूरची बातमी आली. आणि मग सुरु झाला बातम्या बघण्याचा सिलसिला. आम्ही 15 मेला निघणार होतो. पुणे - डेहराडून विमान पुढे बाय रोड ऋषिकेश. ट्रेक होणार - नाही होणार वाटायला लागलं. घरचे म्हणे काही अडलंय का आत्ताच जायचं, नंतर जा कधीही. उत्तराखंड लांब असलं पाक सीमेपासून तरी विमानतळ बंद केला तर जाणार कसं, पोचलो तरी येताना काय - बातम्या बघून तर ऐन युद्धात नसतं साहस करतोय असं वाटायला लागलं. तरी चालणं चालू ठेवलं होतं. माझा आणि मैत्रिणीचा रोज फोन - काय करायचं. माझं म्हणणं होतं थांबू 13 पर्यंत आणि मग विमान तिकीट cancel करू. Foliage वाले त्यांच्याकडून ट्रेक होणार असंच म्हणत होते. 10 मे - मी मैत्रिणीला मेसेज केला होता - चमत्कार होऊन सगळं सुरळीत व्हावं असं वाटतंय - वेळ दुपारी 3:40 ची. मग आम्ही बाहेर पडलो - dry fruits, बाकी खाऊ आणायला. नाहीच गेलो तरी घरी तरी खाऊ लागतोच पण weekdays मधे जमलं नसतं म्हणून शनिवारी ठरल्याप्रमाणे गेलो. दुकानातही मी फोन काढून बातम्या बघत असताना trump कडून ceasefire जाहीर अशी बातमी फ्लॅश झाली आणि पहिला फोन मैत्रिणीला - ती पण बाहेर होती. जो काही आनंद झालाय - नव्या जोमाने बाकी पण काय काय खरेदी केली. घरी आलो आणि रात्री पुन्हा बातमी पाककडून हल्ले. म्हंटल आता नव्या जोमाने आपण हल्ले केले तर पुन्हा बारगळणार कि काय जाणं. तरी रविवारी टेकडीवर जाऊन आले. मग जरा 2 दिवस शांत गेले. म्हंटल त्या तुंगनाथाच्या मनात असणार आमची भेट घेणं म्हणून जुळून आलं सगळं.

11 मे ला भावाकडून walking stick आणली त्याची सवय करावी म्हणून 12 ला पुन्हा तळजाईवर जाऊन आले. 12-13-14 मे ऑफिसचं काम, जाण्याची तयारी, चालणं, बॅडमिंटन ह्यात गेले. कधी नव्हे ते एकटीचीच बॅग भरायची होती. मी बाहेर आणि मुलगी-नवरा घरात असं पहिल्यांदाच होणार होतं. Travel light इतकं मनावर घेतलं कि आम्हा 5 जणींमध्ये माझी बॅग सगळ्यात लहान होती. 14 ला रात्री 11 ला ऑफिसची शिफ्ट संपवून लॅपटॉप बंद केला, पासवर्ड लिहून ठेवला. आधी एकदा ट्रीपवरून आल्यावर पासवर्ड चुकल्याने अकाउंट लॉक झालेलं आणि परत आल्यावर एक दिवस ते निस्तरण्यात गेलेला :D

15 ला दुपारी 3 चं विमान होतं त्यामुळे सकाळी वेळ होता. नवरा म्हणे जा चालून ये, म्हंटल नाही आता बास प्रॅक्टिस. आता डायरेक्ट हिमालयात चालणार :ड

bc37a37f-87b3-4ee6-8e34-4f082632bf7b.jpeg

Keywords: 

वर
0 users have voted.