तुंगनाथ - देवरियाताल भाग-३

दुसऱ्या दिवशी सकाळी 8 ला निघायचं होतं, 7:30 ला ब्रेकफास्टसाठी खाली भेटणार होतो. आत्तापर्यंत सगळ्या ट्रिप्स आम्हीच प्लॅन केलेल्या असल्याने हे जरा नवीन होतं. बाकी वेळी आपण मनाचे राजे असतो, प्लॅन मागे पुढे करू शकतो. हाही एक अनुभव घेतला. आम्ही 5 च जणी होतो आणि सगळ्या वेळेच्या आधीच तयार असायच्या त्यामुळे वाट बघणे प्रकार नव्हता.
8-8:10 ला गाडी निघाली. एखाद तासाच्या अंतरावर शिवपुरी म्हणून ठिकाण आहे तिकडे सगळे adventure sports होतात. तिकडे गंगा नदीवरून जाणारं zip line करायचं होतं. मी नाहीच म्हणत होते पण सगळे कर कर म्हणत होते. मला वजनाची चिंता आणि खाली गंगा नदीचं टेंशन :D

सगळे गियर घालून त्यांनी छोटासा डेमो द्यायला नेलं त्यांच्याच आवारात. छोटासा प्रॅक्टिस ट्रॅक केलेला होता. इंस्ट्रक्टरने ब्रेक कसा कधी लावायचा वगैरे शिकवलं. एक हात दोरीवर आणि एक त्या हुकवर.

बाकीच्यांना जमलं, ब्रेकसाठी दोरीचा हात सोडून हलके घासायचं होतं दोरीवर जेणेकरून फ्रिक्शन तयार होऊन स्पीड कमी होईल, मी हात सोडला आणि पुन्हा दोरी पकडली घाबरून त्यामुळे पहिल्यांदाच हिसका बसला हाताला, तो म्हणे प्रॅक्टिस करा, पण कसलं काय, हात सोडला तरी मी पुन्हा दोरी पकडतंच होते, ब्रेकचं लागेना. 3 वेळा प्रयत्न केला म्हंटल बास, कुठेतरी हात लचकायचा त्यापेक्षा नकोच करायला. सगळ्यांचे व्हिडीओ काढले :D

इकडून झिप लाईन केलं -

f32d5763-05af-4542-b57c-cab3d8235d56.jpeg

तिकडून निघालो, वाटेत रुद्रप्रयागला मंदाकिनी आणि अलकनंदा संगम आणि देवप्रयागला अलकनंदा- भागीरथी संगम बघितला. आजूबाजूला इतकं सुंदर दृष्य होतं पण वळणावळणाचे रस्ते त्यामुळे मी आणि अजून एक जण डोकं धरून बसलो होतो. बाकीच्या तिघींच्या गप्पा सुरु होत्या. आम्ही 5 जणी पहिल्याच दिवसापासून छान मिक्स झालो, झिम्मा पिक्चरची आठवण येत होती - आमच्या टूर लीडरला आम्ही सिद्धार्थ चांदेकर नाव देऊन टाकलं :D

00477a7f-0b9e-4151-96ac-e2608736ed3d.jpeg

72d72284-c781-47c0-ad79-314f50c10361.jpeg

वाटेत 2 वेळा चहा मग जेवण असे ब्रेक घेत जात होतो. दुपारी एक च्या सुमारास हवा एकदम बदलली आणि जोरात पाऊस सुरु झाला. हवा पण छान थंड झाली. साधारण 3 च्या सुमारास आम्ही हिमालयन इको लॉजेसच्या गुप्तकाशी जवळच्या वेदांत व्हॅली रिसॉर्टवर पोचलो. डोंगरात पायऱ्या पायऱ्यांच्या उतारावर कॉटेजेस होती आणि शेजारीच मंदाकिनी नदी. सगळीकडे हिरवंगार, सुंदर फुलझाडं, प्रथम दर्शनीच प्रेमात पडायला झालं. रिसॉर्टवर पाऊस थांबलेला होता पण हवा मस्त गार त्यामुळे रूम्सवर जायच्या आधी चहाची ऑर्डर दिली. रूम्स वर जातोय तोच लीडर म्हणे पाऊस थांबलाय तर नदीवर जाऊन येऊ. नदीकडे जायची वाट निसरडी झालेली, तसंच धडपडत गेलो.

पाऊस थांबून मस्त ऊन आलेलं त्यामुळे नदीवर चांगला तासभर काढला. नदीच्या नितळ, निर्मळ गार पाण्यात पाय सोडून बसलो, दगड गोळा केले, फोटो काढले :D

5594199d-70bf-4fc6-af2f-4965746f0fa0.jpeg

हे आमचं रिसोर्ट -

9b180b30-b96e-48b4-a5e7-9aef13b7d34a.jpeg

हम पांच -

img_2184.jpeg

743e19d2-6594-4ae6-8b2b-3290eef57e05.jpeg

198506d6-72b1-4a62-b3b2-c476a0b16174.jpeg

ह्या मिनी ट्रेल आणि थंडगार हवेमुळे मस्त भूक लागली होती. रिसॉर्टवर आमच्या व्यतिरिक्त एक जर्मन माणूस होता, तो कधीच खाऊन घ्यायचा त्यामुळे आमचंच राज्य होतं. गरम गरम फुलके, 2 भाज्या, गरम डाळ भात आणि शेवटी खीर.

दुसऱ्या दिवशी देवरियाताल हा प्रॅक्टिस ट्रेक होता. त्याची माहिती देऊन लीडरने 7 चा कॉल टाईम दिला.

वर
0 users have voted.