झुकिनीच्या काचऱ्या

झुकिनीचे प्रयोग करताना आवडलेला हा एक -

साहित्य

२ झुकिनी
२ मध्यम आकाराचे कांदे
३-४ टेबलस्पून तेल
फोडणीसाठी - १ लहान चमचा मोहरी, हळद, धणेपूड,
हिंग
१ टिस्पून तिखट (आवडीप्रमाणे कमी जास्त)
गोडा मसाला

चवीनुसार मीठ
१ लहान चमचा गूळ

कृती -

कांदा उभा चिरून घ्या. झुकिनी धुवून अर्धगोल चकत्या करून घ्या.

एका पसरट पॅन मध्ये तेल गरम करून त्यात मोहरी घाला, तडतडली की हिंग आणि कांदा घालून परता. कांद्याला गुलाबी रंग आला की हळद, धणे पूड, तिखट, मीठ आणि गोडा मसाला घालून परतून घ्या. आता झुकिनी घालून मध्यम आचेवर झाकण ठेवून शिजवून घ्या. झुकिनी पटकन शिजते, तसा अंदाज घेऊन शेवटची दोन मिनिटं हाय फ्लेम वर झाकण न ठेवता शिजवा, म्हणजे छान खरपूस होते.

screenshot_20250615-101336.png

पाककृती प्रकार: 

वर
0 users have voted.