जुलै जागतिक जलरंग महिना - ३१ दिवस ३१ जलरंग चित्रे

तर यंदा इन्कोटोबरच्या वावटळी आधी अजून नवीन वावटळ आणू म्हणतेय Haahaa 2 तर त्याचे असे झालं.....

काही दिवसांपूर्वीच मला समजलं की जुलै महिना "जागतिक जलरंग चित्रे (वॉटरकलर) महिना" म्हणून साजरा केला जातो. Blessed मला तर हे जामच आवडलं.

"Doodle wash" ह्या समुदायाचा निर्माता Charlie O’Shields ह्याने 2016 पासून हा उपक्रम सुरू केला. त्याला स्वतःला जलरंग माध्यम खूप आवडतं म्हणून एक कलात्मक चळवळ, ह्यातुन स्फुर्ती मिळून अधिकाधिक लोकांनी जलरंगात चित्रे काढावीत हा ह्या सर्वामागचा उद्देश आहे. 31 दिवस 31 जलरंग चित्रे काढणे हे चॅलेंज आहे आणि ते खरोखर माझ्यासाठी सुध्दा मोठेच चॅलेंज आहे. Sheepish-laugh

या उपक्रमासाठी inktober सारखेच चार्लीने दर दिवसासाठी prompt list म्हणजे दर दिवसाच्या विषयांची लिस्ट ही दिलेली आहे. त्याप्रमाणेच चित्रे काढायला पाहिजे असे काही नाही पण तरी हे विषय तुमच्या क्रियेटीव्हीटीला फारच आव्हान देतात. जमेल तसं करावं.

2016 पासून चालू असलेले हे चॅलेंज मला या वर्षी नजरेस पडतंय. जलरंग चित्रे काढायला तर मला आवडतातच तेव्हा म्हटलं ही आपल्यासाठी पर्वणी आहे समजूया. ह्यानिमित्ताने माझा वॉटरकलरचा सराव पण होईल. रोज नेमाने कितपत जमेल माहीत नाही पण जास्तीत जास्त चित्रे काढण्याचा प्रयत्न नक्की करणार.

doodlewash ने दिलेले prompts अगदीच डेंजर आहेत. तेही जमतील तसे करेन, बाकी मला आवडतील तशीच चित्रे काढेन Biggrin

तर मैत्रिणींनो तुम्ही पण येताय ना माझ्या सोबत जलरंगाची मजा अनुभवायला!!!
पेपर, जलरंग, ब्रश घ्या आणि व्हा सुरु Heehee

world-watercolor-month-july-with-palette3.jpg

504686134_18517053517061022_2401706182479711441_n.jpg

कलाकृती: 

वर
0 users have voted.