जर्मनी आणि बरेच काही.. भाग 1

आशय (माझा मुलगा, जर्मनीत MS च्या दुसर्‍या वर्षाला आहे) जर्मनीत शिकत असल्यामुळे आमचा युरोप दौरा जर्मनी पासून सुरू होऊन जर्मनीत संपवणे असा नेम मागच्या वर्षापासून झाला आहे! हे वर्ष कसे अपवाद असेल!
जर्मनी जवळचे Austria Switzerland देश तिथल्या निसर्ग सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहेतच पण जर्मनीची कधी tourist destination अशी ओळख ऐकली नव्हती. जर्मनी इतकी सुंदर स्थळं दडवून बसलाय याचा पत्ताच नव्हता. इथे एक मजा आहे. एक पाय जर्मनीत तर दुसरा Austria मध्ये अशी अनेक पर्यटन स्थळं आहेत!
इथे 58 युरोचे तिकीट काढले की जर्मनीभर सगळ्या प्रकारचा public transport वापरता येतो. Google map ,DB हे इथले train app आणि हे तिकीट असले की भाषा येत नसेल तरी व्यवस्थित प्रवास करता येतो.
गेले दोन दिवस नितांत सुंदर अशी सरोवरं पहिली.
परवा पाहिले पाचूच्या रंगाचे देखणे Königssee. बर्चटेसगाडेन राष्ट्रीय उद्यानातील कोनिग्सी तलावाची सहल म्हणजे एक अद्वितीय नैसर्गिक अनुभव आहे. या हिरव्या मायाजालात एकदा आपण बोटीने प्रवास सुरू केला की आजूबाजूचा कोलाहल सगळा विरून जातो. समोरच्या डोंगरावरून येणारा प्रतिध्वनी ऐकवायला बोटीचा कंडक्टर trumpet वाजवतो. तो ऐकणे हा एक अद्भुत अनुभव आहे.
इथे एक 12 व्या शतकापासून असणारे St Barthloma चे चर्च आहे. आजूबाजूचे पहाड, तलावाचे हिरवीगार पाणी याच्या पार्श्वभूमीवर लाल घुमट असणारे हे चर्च हे अतिशय सुंदर दृश्य दिसते.
Konigsee हा जर्मनीतील सगळ्यात स्वच्छ तलाव आहे. पाण्याचा तळ आरपार दिसत राहतो. इथल्या Alps च्या पर्वताच्या मनोरंजक कहाण्या आहेत. या तलावातील बोटीचा प्रवास अतिशय अविस्मरणीय अनुभव होता.
img-20250904-wa0015.jpg
आज गेलो होतो Bodensee या सरोवराला. हा तलाव जर्मनी Austria Switzerland अशा तीन देशांमध्ये पसरलेला आहे इतका प्रचंड मोठा आहे. त्यामुळे याला Swabian sea असेही नाव आहे. हा तलाव प्रसिद्ध आहे इथल्या Bavarian सिंहाच्या पुतळ्यासाठी आणि इथले नवे जुने light house. इथले Lindau गावही छान आहे. अतिशय जुन्या जुन्या इमारती इथे उत्कृष्ट अवस्थेत वापरात आहेत. इथले 15 व्या शतकात बांधलेले townhall आणि देखणी चर्चेस बघण्यासारखे आहे.
असे सध्या उदंड पाहिले पाणी सुरू आहे!
img-20250906-wa0018.jpg
उद्या अजूनच एक अद्भूत जागा बघायला जायचे आहे. ते सांगायला मी पुन्हा येईनच!!

वर
0 users have voted.