#Europe2025
म्युनिक जवळ मिट्टेनवाल्ड नावाचे एक नितांतसुंदर गाव जर्मन अॅल्प्स् पर्वत रांगेत वसलेले आहे. व्हायोलिन वाद्याचे हे जन्मगाव. हे गाव व्हायोलिन म्युझियम, भिंतीवरील fresco paintings आणि देखण्या निसर्गसौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे.
इथली Leutaschklamm नावाची जागा तिथला धबधबा आणि नदीवरील 75 meters उंच suspension bridge साठी लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे.
इथे जायला स्वप्नामधील गावातून जाणारी वाट आहे. हिरवीकंच कुरणं, हिमाच्छादित डोंगर, खळाळून वाहणारी निळी निळी नदी सोबतीला असते.

खिंडीच्या प्रवेशद्वारापासून जंगलातून वाट वर वर चढत जाते. वाटेत या जंगलात राहणाऱ्या goblins च्या गोष्टी वाचत आपण डोंगर चढत जातो. मग लागतो इथला प्रसिद्ध panoramic bridge. खाली खोल खळाळत जाणारी निळी नदी वर हा लोखंडी झुलता पूल. खरोखरच झुलतो तो! याच्या एका बाजूला ऑस्ट्रिया आणि एका बाजूला जर्मनी. या पुलाची खालची बाजू लोखंडी जाळी आहे. त्यातून आरपार खोलवर नदी दिसते. अतिशय थरारक अनुभव आहे तो.




पूल ओलांडून परत डोंगर उतरून आल्यावर प्रवेश दारापाशी इथला धबधबा बघायला जायची वाट आहे. लाकडी वाटेवरून आत जाताच प्रचंड आवाज येऊ लागतो. थोडे अंतर चालून गेल्यावर पाण्याचे तुषार आपले स्वागत करतात आणि सामोरे येते धबाबा लोटती धारा धबाबा तोय आदळे! दुसरे शब्दच नाहीत त्या कल्लोळाला.

हेच पाणी पुढे देखण्या निळ्या रंगाची नितळ नदी बनुन आपल्या सोबत परत प्रवास करते.


परतीची वाट
अतिशय अद्भुत असा हा जलानुभव . घ्यायलाच हवा असा..
