युद्धातली डायरी 4

10-15 मार्च
सध्या रमादानचे सरते दिवस आहेत. हे दिवस या लोकांसाठी सगळ्यात जास्त प्रार्थना करण्याचे असतात. त्यामुळे बहुधा दिवसा होणारे स्फोट सध्या खूप कमी झाले आहेत. रात्री मात्र boys पाणी पिऊन, खाऊन येतात. रात्रीची प्रार्थना झाली की सुरू होतात. मला लहानपणी आम्हा भावंडांना पिशवीत आपापल्या वाटणीचे फटाके मिळायचे दिवाळीत तसेच या लोकांना कोणीतरी वाटून देते missiles drones असे वाटत असते !!
सध्या बहारीन ला uk चे air force protection मिळाले आहे. त्यांची विमाने आणि हेलिकॉप्टर फिरत असतात. ते बरीचशी drones ,missile intercept करतात. त्याचा मोठा आवाज येतो. नंतर शांतता होते असे सुरु आहे.
13 तारखेला माझ्या नवर्‍याचा वाढदिवस याच ढोलताशांच्या कडकडाटात आम्ही ब्रेकफास्ट मध्ये मिळणारा केक कापून केला! मग तो as usual कामावर गेला.
तो इथे Gulf petrochemicals मध्ये engineer आहे. अजयची कंपनी petrochemical products वापरून त्याचे अमोनिया, urea,methanol बनवते ते आपल्याला लागणार्‍या literally प्रत्येक वस्तूच्या उत्पादनासाठी अत्यंत महत्त्वाचे असते. ते बनवण्यासाठी कंपनी कडे काही हजार टन इतका अमोनिया, methanol इत्यादी ज्वालाग्राही माल प्रचंड मोठ्या टाक्यांमध्ये साठवलेला असतो. जेव्हा शेजारच्या refinery वर drone पडतात, आगी लागतात तेव्हा याच्या इथे पण drone missiles चा डेब्रिज पडून आग लागते. जर काही हजार टन अमोनिया टॅन्क वर आग लागली तर अर्धे बहारीन असेच उडेल किंवा त्याची वायू गळती होऊन पण चालत नाही. थोड्याशा अमोनिया च्या वासाने पण त्रास होतो. म्हणुन disaster management team बरोबर coordinate करत company रोज 1100 ton अमोनिया चा urea बनवते. जास्तीत जास्त लवकर अमोनिया संपवायला हवा आहे. आता प्रॉब्लेम असा आहे की urea बनवलाय पण कंपनी ची जहाजे अडकून बसली आहेत समुद्रात. तो माल नेणार कसा, ठेवणार कुठे. परत काही हजार टन methanol सारखा प्रचंड ज्वालाग्राही पदार्थ पण सांभाळायचा आहे. त्यासाठी मोठय़ा प्रमाणात पाणी लागते. गल्फ मध्ये पाणी समुद्राचे पाणी desalination करून वापरतात. अजय ची team दिवसरात्र desal plant मेंटेन करते. म्हणजे company ला products बनवण्यात अडचण येत नाही आणि आग लागल्यास पाणी तयार असते. त्याची duty ही essential आहे. त्यामुळे या दिवसांत पण त्यांना दिवसरात्र जावेच लागते. Petrochemical plants आपण घाबरलो म्हणुन abandon करून जाता येत नाहीत. प्रत्येकाला आपले काम करावे लागते.
Missiles drones attacks रात्री तसेच petrochemical plants वर होत असल्यामुळे प्रचंड ताण येतो. या आठवडय़ात इथे जरा प्रमाण कमी झाले आहे. आता याला दोन दिवसानी का होईना off मिळेल. कारण आता अमोनिया सेफ अवस्थेत आहे.
या युद्धानंतरचा काळ अवघड दिसतोय जगासाठी. कारण सध्या गल्फ मधल्या सगळ्या oil gas company प्रॉडक्शन बंद किंवा अत्यंत कमी काढत आहेत. आत्ता ,भारतात जो काही gas मिळाला आहे ती जहाजे स्वतः अत्यंत तणावपूर्ण स्थितीत अडकली होती. गॅस सांभाळत समुद्रात उभे असणे या दिवसात ही भयानक रिस्क आहे. त्यामुळे ती जहाजे निघायला हवीच होती. पण यानंतर मात्र पाठविण्यासाठी gas चे उत्पादन नाही आहे. Essential petrochemical products ची निर्मिती पूर्ण बंद आहे. कंपन्या सुरू झाल्या की त्या चालवण्यासाठी लागणारा natural gas प्रचंड महाग होणार आहे. त्यामुळे महागाई प्रचंड वाढेल. दोन्ही युद्धखोर देश अजूनही वल्गना करण्यात मग्न आहेत. युद्ध थांबायचे कोणतेही चिन्ह दिसत नाही.
तरी इथे अजून तरी कोणतीही panic दिसत नाही. सर्व वस्तू भरपूर मिळत आहेत. भाजीपाला अन्नधान्य इत्यादीची supply chain अत्यंत व्यवस्थित सुरू आहे. अफवांना आळा घालण्यासाठी सोशल मीडिया नियंत्रण सुरू आहे. लोकांचा सरकारी कारभारावर विश्वास आहे. इथला राजा, तसेच crown prince अगदी lulu सारख्या ग्रोसरी स्टोअर मध्ये फिरून सगळे मिळते आहे, साठेबाजी होत नाही याकडे लक्ष ठेवून आहेत. इंटरनेट वीज पाणी व्यवस्थित सुरू आहे.
आगी लागल्या की अत्यंत त्वरेने सगळ्या सिस्टम काम करत असतात. हॉस्पिटल सुरू आहेत. दिवसा इथे युद्ध सुरू आहे असे वाटत नाही असे वातावरण असते. त्यामुळे panic होऊन भारतात जाणारे लोक सध्या तरी दिसत नाहीत. यापुढे काय होईल माहीत नाही. आम्ही भारतात लगेच येऊ शकत नाही कारण सुट्टी मिळत नाही. खोटे कारण देऊन येणे, आई वडील आजारी असे काहीतरी आम्हाला दोघांनाही पटत नाही. आम्ही या परिस्थितीचा विचार करताना आमच्यावर कोणीही अवलंबून नाही, त्यामुळे पळापळ करून निदान आपल्याकडून system वर ताण आणायचा नाही ठरवले आहे. आमचा मुलगा मोठा आहे आणि सुरक्षित आहे. आमच्या पालकांकडे बघायला आमचे बहीण भाऊ आहेत. आमचे पैसे सुरक्षित भारतात हलविले आहेत. मुलाला आम्हाला काही झाल्यास कोणाला contact करायचे, पुढचे कसे अरेंज करेल असे सर्व सांगितले आहे. पण जीवाला धोका नाही वाटत किंवा आम्ही दगडी make चे बनलो आहोत. आशा करतो आहोत की हे लवकर संपावे. मग मात्र कदाचित परत यायचा विचार करू. Can't go through this nightmare again and again.

wa_1773814460405.jpeg

वर
0 users have voted.