मुगाची उसळ

आता ह्यात मुद्दाम पाककृती लिहिण्यासारखं काही नाहीये, तरीही माझ्यासारख्या सगळे पदार्थ विसरून आणि पुन्हा वाचून करणाऱ्यांसाठी लिहून ठेवतेय. कदाचित तुम्ही नेहमी करता त्यापेक्षा वेगळी चव मिळून जाईल.

साहित्य:
मोड आलेले मूग - ३ वाट्या
कांदे - २ बारीक चिरलेले
घट्ट दही - दोन मोठे चमचे
हिरव्या मिरच्या -  दोन -तीन,
कढीपत्त्याची पाने 
कोथिंबीर - वाटीभर बारीक चिरलेली
लसूण पाकळ्या - सहा
आलं - एक इंच
खवलेलं ओलं खोबरं -  पाव वाटी
तेल - १ मोठा चमचा
फोडणीसाठी जिरे, हिंग, हळद, 
चवीनुसार मीठ,
चमचाभर साखर
गरम पाणी - ग्लासभर

कृती:
१. खोबरं, कोथिंबीर, कढीपत्ता, मिरची, आलं, लसूण आणि दही मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावं.

२. कुकर मध्यम आचेवर ठेवून त्यात तेल, जिरं आणि हिंगाची फोडणी करा, त्यात कांदा आणि हळद घालून नीट परतून घ्या.

३. त्यात मूग घालून, मूग बुडतील एवढे गरम पाणी आणि मीठ घालून झाकण लावा. तीन शिट्ट्या झाल्यावर गॅस बंद करून कुकर गार होऊ द्या.

४. कुकर उघडा. गॅस सुरू करा, कुकरमध्ये आधी केलेले नारळाचे वाटण आणि थोडी साखर घालून ढवळा आणि पाच मिनिटे उकळू द्या. गॅस बंद करा.

खूप सोपी आणि छान उसळ होते. पोळी, भात  दोन्ही बरोबर छान लागते. कुठलेच मसाले नसल्यामुळे मुगाची मूळ चव कळते.

img-20260423-wa0003.jpg

पाककृती प्रकार: 

वर
0 users have voted.