पैशाचे घर

भाच्याचे गडग्नेर (केळवण) आहे उद्या. त्याला आम्ही सगळे मिळून पैसेच देणार आहोत, त्याच्या नवीन संसारासाठी, नवीन घरासाठी उपयोगी वस्तू घेण्यासाठी!
पण पैसे, चेक हातात देण्याएेवजी या घरात घालून देणार :)
हे समोरून. दरवाजा, दोन खिडक्या, मधोमध घंटा - तिचा उपयोग आहे हं ...
IMG_20160312_094214.jpg

हे बाजुनी. एक मोठी खिडकी, घराला छान व्हेंटिलेशन आहे हो आमच्या. अशीच पलिकडेपण आहे हं!
IMG_20160312_094248.jpg

ती समोरची घंटा धरून थोडं वर ओढलंत ना की छप्पर अलगद वर उचललं जाईल. (घंटेमागचे विल क्रो अलग होईल) आतलं झाकणही उघडेल अन आतला डब्यातला एेवज दिसेल. आता अजून ठेवला नाहीये, म्हणून तुम्हाला नुसताच मोकळा डबा दिसेल Heehee
IMG_20160312_094311.jpg
आवडेल ना भाचा अन सुनेला हे पैशाचे घर? :)

Keywords: 

कलाकृती: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle