रंग खेळू चला - "ईट युअर कलर्स" - " पुलिंतांपाजिमि"

"पुलिंतांपामि" नक्की इथल्या अनेकजणींना हा माझा टायपोच वाटला असणार Lol
तरीही अवलची व्होकॅबलरी माहिती असलेल्या गोंधळात नक्की पडल्या असतील ना? नक्की काय बरं लिहायचं होतं हिला :thinking:
पण काये न लोलाच्या श्टाईलच्या उपक्रमाला थोडं तरी जागलं पाहिजे न? :ड
तर झालं असं की आज लेकाला बिर्याणी खायची हुक्की आली. मग स्वाभाविकच मला सामीची आठवण आली. मग काय घातला बिर्याणीचा घाट :fadfad:
तर तांदूळ घाटत असताना मला लोलाची आठवण आली. मग म्हटलं घालून टाकू "ईट आपलं ड्रिंक, युवर कलर्स"चाही घाट Dancing
मग ओट्यावरच्या वस्तू दिसू लागल्या :waiting:
एकीकडे उकळत असलेले तांदळाच्या चौपट उकळत असलेले आधण... त्यातले किमान निम्मे उपसून टाकायचे म्हणून हळहळत पडलेला माझा इवलुसा जीव, पलिकडे चिरून चिकनमधे पडायची वाट पहात बसलेला पुदिना, सकाळी केलेल्या पोहांवर विराजमान झालेल्या लिंबांच्या फोडींच्या न वापरलेल्या नाराज फोडी, तिखट असल्याने पोह्यात टाकायसाठी काढलेली पण वगळलेली एक मिरची... आता रागाने अजूनच तिखट झालेली, ... अन तेव्हढ्यात लेकाची आलेली नवीन फर्माईश, "आई कोणतं सरबत करू? मरणाचे उकडतेय!"
झालं! इतकेसारे साहित्य असल्यावर अजून काय हवं होतं? मेन पदार्थाचा घाट तर ठरला. राहिली फक्त कृती Heehee

तोवर तांदूळ परतून झालेले. मग ढकललं आधण त्यात. दोन उकळ्या आल्या दणदणीत.
तोवर पुदिना चिरून घेतला.
लगेहात लिंबाच्या फोडी पिळून रस काढून घेतला.
अन उपसून टाकला शिजलेला भात, खाली तयार होतं तांदळाचे पाणी!
भाजलेले जिरे थोडे खरडून घेतले.
त्यातच ती तिखट्ट मिरचीही खरडली.
सोबत मीठ साखरही घेतली.
IMG_20160319_114843.jpg
आणि सगळं मिक्सरमधे ढकलल, फिरवलं. मोठ्या चाळणीतून गाळून फ्रिजमधे गारेगार केले.
आणि मस्त सजवून सर्व्ह केले, " पुलिंतांपाजिमि" !
घ्या तुम्हीपण एक एक सीप :ड
IMG_20160319_114857.jpg

Keywords: 

सृजनाच्या वाटा: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle