गारेगार पन्हं!

panha 1.jpg

हिरव्या हिरव्या रंगाची कैरी चटकदार
सांग गं मुली लागतं कसं पन्हं गारेगाऽर
हिरव्या हिरव्या...

हिरव्या हिरव्या कैरीला उकडा छान छान
गरामध्ये घाला साखर

ओ! ते माहितेय आम्हाला... पण आमचं पन्हं सुरेख केशरी पिवळसर दिसतं, पन जल्लां तुमचं पन्हं हिरवं हिरवं कसं काय दिसतंय? :thinking:

कारण त्यात घातलाय पुदिना! Party

panha 2.jpg

नेहमीसारखंच कैरी उकडून गराच्या दुप्पट साखर घालून मिक्सरमधे अगदी बारीक तलम वाटून घ्या. मीठ घाला. केशर वेलची अजिबात नको. कारण पुदिन्याच्या स्वादापुढे हे स्वाद लपून जातात.पन्हं तयार करतेवेळी मिक्सरच्या भांड्यात गर घेऊन पुदिन्याची पानं घाला. दोन ग्लास पन्ह्यासाठी मूठभर तरी पानं लागतील. आवडत असेल तर आल्याचा बारीक तुकडा घाला. मला आज फ्रिजात आलं सापडलं नाही, म्हणून फोटोत दिसत नाहीये. सगळं छान एकजीव होईपर्यंत बारीक वाटा. पुदिना बारीक व्हायला वेळ लागतो. मग मस्त थंडगार पाणी घालून झर्रकन ब्लेंड करा. ग्लासात ओता आणि घोट घोट प्या. कलेजे को ठंडक पहुंच जाएगी!!

आता माझे मारकं!

१. दिलेल्या रंगाची भाजी/फळ वापरले - १ मार्क (मी पुदिना आणि कैरी असे दोन दोन हिरवे पदार्थ वापरलेत, २ मारकं पायजेत मला!)
२. तयार झालेल्या पदार्थाचा रंग भाजी-फळाचा जो होता तोच आहे. - २ मार्क, वेगळा आहे- १ मार्क. - रंग की हो हिरवा!!
३. फोटो दिलाय - १ मार्क (दोन फोटो - २ मारकं!)
४. पारंपारिक रेसिपी - १ मार्क, पारंपारिक विथ ट्विस्ट - २ मार्क, नवीन ओरिजनल - ३ मार्क - पुदिन्याचा ट्विस्ट की वो! २ मारकं.
५. क्यालरी - बरोबर आहे का ते सांगा!

panha 3.jpg

सृजनाच्या वाटा: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle