रंग खेळू चला - ईट युअर कलर्स- आठवडा ४

मु: काय आज सुस्तावलाय... रंगढंग संपले वाटतं!
ब. संपतील कशे? दोनच तर रंग झालेत..
मु: पुढचा रंग द्या की मग.
ब: तेच सांगाय आलोय न्हवं का! आता एक न्हाई एकदम दोन-तीन दिल्यात!
पिवळा-केशरी निळा-जांभळा
मु: अरे वा! रंगीबेरंगी. :ड कच्च्या खायच्या का मग फळं भाज्या?
बः आँ? :thinking: का म्हणून?
मु: नाही म्हटलं, काल सगळ्यांनी इतका स्वयंपाक केलाय, इतका स्वयंपाक केलाय की आता आठवडाभर या बायका काही करतील असं वाटत नाही. ROFL
बः दमल्या असतील, पण करतील रे, फ्लॅटब्रेड करा म्हंतायत!
मु: म्हणजे?
बः म्हणजे पराठे, धपाटे, थालिपिठे, ठेपले, पिझ्झा! भाजायचं म्हणे फक्त.. आधी हाताला चटके..
मु: चांगलंय, म्हणजे कालच्या उरलेल्या भाज्या ढकला, कोशिंबीरी ढकला, श्रीखंड ढकला! :ड
बः श्रीखंडाचे धपाटे?? :surprise:
मु: का नाही? उरलेल्या- पाकातल्या आम्रखंडाचे धपाटे! आंबापोळीसारखे लागतील की नाय? Nerd
बः प्वाईंट आहे बरं का तुझ्या बोलण्यात. दिलेल्या रंगाचं भाजी फळ असलं म्हंजे झालं!
---------------------------

रंग - पिवळा-केशरी निळा-जांभळा
पदार्थ - पराठे, धपाटे, थालिपिठे, ठेपले, पिझ्झा! उर्फ फ्लॅटब्रेड्स.

नियम-१- जो भाग पदार्थात वापरणार तो दिलेल्या रंगाचा असला पाहिजे. एक किंवा अनेक भाज्या/फळं चालतील. त्यासोबत अजून काहीही वापरु शकता.
नियम-२- त्या भाजी किंवा फळाचा खाण्याचा पदार्थ बनवायचा.
नियम-३- त्याचा फोटो काढायचा.
नियम-४- त्या पदार्थाची कृती लिहायची.
नियम-५- फोटो आणि कृती "मैत्रीण" वर "सृजनाच्या वाटा" मध्ये पोस्ट करायची.
नियम-६-(कडक) कृत्रिम रंग वापरायचा नाही!
------------------
मार्किन्ग शिश्टीम.
१. दिलेल्या रंगाची भाजी/फळ वापरले - १ मार्क
२. फोटो दिलाय - १ मार्क
३. पारंपारिक रेसिपी - १ मार्क, पारंपारिक विथ ट्विस्ट - २ मार्क, नवीन ओरिजनल - ३ मार्क
४. कॅलरी तक्ता पुरवला - २ मार्क. इथला कॅलक्युलेटर वापरु शकता- http://www.myfitnesspal.com/recipe/calculator

नववर्षाची सुरुवात उत्साहाने करा, सुस्तावू नका. Sit Up

सृजनाच्या वाटा: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle