किल्ले रायगडला भेट देऊया

मुलींनो गेले काही दिवस मी शिवचरित्र जरा जास्तच वाचते आहे आणि ते वाचून रायगड येथे भेट देण्याची इच्छा जरा जास्तच वाढत चालली आहे. रायगड अशाकरता की रायगडावर वर पर्यंत जाण्यास रज्जुमार्ग उपलब्ध आहे. आणि नुकतीच गेल्या तीन वर्षात सिंहगड आणि प्रतापगड येथे भेट देऊन झाले आहे.

विचार असा आहे की संध्याकाळी बोरिवली / दादर येथून निघून पहाटे पहाटे रायगडाच्या रज्जुमार्गाजवळ पोहोचायचे. रज्जुमार्गाने वर गेल्यावर किल्ला पाहायचा. रज्जुमार्गाने जाण्याचे कारण असे की १८ व्या वर्षी रायगड चढताना लगलेली वाट आजही आठवतेय. आज ह्या वयाला अज्जिब्बात व्यायाम नसताना हिम्मत नाही वर चढायची. आणि गड पाहायचा तो माहित नसलेल्या कुठल्या कुठल्या वाटांवर जायचा अति आगाऊ पणा न करता. संध्याकाळच्या वेळी खाली उतरायचे, ह्यावेळी पाऊलवाटेने उतरायचे. उतरायला सोपा आहे गड. आणि संध्याकाळच्या यशटीने मुंबईस परतायचे.

मला माझ्या ८ वर्षाच्या मुलाला घेऊन जायचे आहे.

मिनु ने सल्ला दिला की सध्या उन्हाळा खुप आहे, सध्या नको जाऊया, पण मला जरा जास्तच ओढ लागली असल्याने मन काही ऐकत नाही. शिवरायांच्या वास्तव्याने पावन झालेल्या दुसर्‍या कोणत्याही किल्ल्यावर जायची माझी तयारी आहे, फक्त तो किल्ला चढायला दुर्गम असू नये एवढीच इच्छा (माझी शारिरिक लायकी नाहीये हो दुर्गम किल्ले चढायची) आणि जाणे येणे सोपे असावे.

तेव्हा आपल्यापैकी कोणी येण्यास उत्सुक आहे का. ज्यांना यायचे असेल त्यांच्या सवडीने दिवस वेळ ठरवु.

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle