विणकाम/भरतकाम

झालरी झालरीचे लेमन पिस्ता आईसक्रिम ;)

बहिणीच्या नातीचे बोर नहाण आहे. तिच्यासाठी हा डबल आईस्क्रिमचा घाट Heehee
IMG_20160106_204923.jpg

IMG_20160106_205123.jpg

IMG_20160106_205108.jpg

Keywords: 

कलाकृती: 

इटुक पिटुक वॉल हँगिंग

आठ इंच व्यासाच्या आकाराचे हे वॉल हँगिंग. त्यावरची फुलं, पानं क्रोशाने विणून तयार केली अन मग कार्डबोर्डवरती कागद चिकटवून त्यावर ही फुलं पानं चिकटवली. बाजुनी लेस चिकटवली, वरून रॅपिंग प्लॅस्टिक लावले. मागे हूक म्हणून लेसचाच तुकडा चिकटवला. झाल् वॉल हँगिंग तयार :-)
IMG-20151231-WA0021.jpeg

Keywords: 

कलाकृती: 

रुमाल

एका नातेवाईकाकडच्या लग्नात रुखबतात फक्त रुमाल नव्हते म्हणून १ दिवसात करुन दिले सगळ सामान आणण्यापासुनच तयारी होती. घाईघाई मधेच भरतकाम डिझाईन काढण्यापासून केले आहे.

20140419_123710-640x480.jpg

20140419_123730-640x480.jpg

20140419_123807-640x480.jpg

Keywords: 

कलाकृती: 

गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड, लार्जेस्ट ब्लँकेट, मदर इंडियाज क्रोशा क्विन्स, पुणे मीट

चेन्नईच्या शुभश्री नटराजन यांची मूळ कल्पना आणि जगभरातील हजारो भारतीय स्त्रियांनी उचललेले शिवधनुष्य म्हणजे, गिनिज वर्ड रेकॉर्ड:लार्जेस्ट ब्लँकेट.
आता पर्यंत हे रेकॉर्ड आफ्रिकेतील आहे आणि ते ३३७७ स्क्वेअर मीटरचे आहे. हे रेकॉर्ड मोडून ५०००, हो पाच हजार स्क्वेअर मीटरचे अजस्त्र ब्लँकेट विणण्याचा विडा भारतीय स्त्री शक्तीने उचलला आहे.

Keywords: 

कलाकृती: 

फेर धरु बाई फेर धरू

एका मैत्रिणीच्या मुलीचे लग्न आहे. तिला शुभेच्छा म्हणून हा सेंटर पीस विणला. सहाही ऋतु हातात हात घालून, तिच्या संसारात छान फुलू देत :-)

सिल्किश बारीक दोऱ्याने, क्रोशाने विणलेला हा सेंटर पीस साधारण अडिच फुटाचा आहे. नेटवर त्याचा ब्लर फोटो बघितलेला. माझ्या मैत्रिणीला फार आवडलेला. मग जरा डोकं लढवून बसवलं डिझाईन.भाचीच्या नव्या घरातील टिपॉयवर शोभून दिसेल ना ?

IMG_20150501_063159.jpg

Keywords: 

कलाकृती: 

मफलर

मैत्रिणीच्या वडिलांना 80 वर्ष पूर्ण झाली. त्यांच्या वाढदिवसाला काय द्यावे विचार करताना मफलरची कल्पना डोक्यात आली. काकांना सरधोपट गोष्टींपेक्षा कलात्मक गोष्टींची आवड आहे. म्हणून मग हा मफलर विणलाय त्यांच्यासाठी. सात फूट लांब अन एक फुट रुंद. आज त्यांचा वाढदिवस आहे, सो संध्याकाळी देईन त्यांना :-)
त्यांना लोंबते दोरे आवडत नाहीत म्हणून दशा नाही लावल्या.

कलाकृती: 

पाने

Subscribe to विणकाम/भरतकाम
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle