July 2017

Frankly, my dear, I don't give a damn!

हा फेमस, पॉप्युलर डायलॉग ज्या मुव्हीमध्ये आहे, त्या मुव्ही बद्दल देखील माझे मत असेच झाले आहे. 'गॉन विथ द विंड'चे कौतुक मी किमान दशकभर ऐकत आले आहे. फार पूर्वी जेव्हा गुगल व्हिडिओज नामक प्रकार अस्तित्वात होता व तिथे बरेच मुव्हीज अपलोड झाले होते, तेव्हा मी हा पाहायचा प्रयत्न केला होता. पण तेव्हा सबटायटल्स नसल्याने मला काहीच कळले नव्हते. मग अधपाव मुव्ही पाहून सोडून दिला होता.

Keywords: 

जलरंग / जीवनरंग २

मागच्या आठवड्यात थोडा ताप होता. त्यामुळे चित्र काढणं जमलं नाही. हे आजचं upload करते.
अनन्त ठिकाणी चुकल्यावर लक्षात आलं आणि सुधारण्याचा प्रयत्न केला. जरा अवधड गेलं कारण हे ब्लॅक अँड व्हाईट नसले तरी यात ठराविक ३ रंग आणि त्याची combinations होती.
नेहमीप्रमाणे मोकळा feedback द्या
Water lilies garden

Keywords: 

ImageUpload: 

बालमने (कथा)

मैत्रीणींनो, ही कथा मला एका स्पर्धेसाठी पाठवायची असल्यामुळे नियमांनुसार इथून काढून टाकत आहे. नंतर पुन्हा पोस्ट करेन.

धन्यवाद

Keywords: 

लेख: 

हार

"अगं चल ठेवते मी फोन...बोलू परत " असं म्हणून मेघानं तिच्या ऑफिसमधल्या मैत्रिणीचा फोन ठेवला. "अगं आई, त्यांनी टॉस जिंकलाय, अँड decided to बॅट, ये लवकर, सुरु झाली मॅच "
"अरे देवा, हो का... त्यांनी जिंकला टॉस, पण ठीक आहे, खेळतील आपल्या पोरी चांगल्या... आलेच मी, स्वयंपाक उरकलाय लवकरच, राहिलेली आवराआवर करते आणि आलेच ५ मिनिटात. "

" झाली का गं मॅच सुरु, मी पण अगदी प्रत्येक बॉल बघणार आहे बाई..." मेघाची आजी आतल्या खोलीतून बाहेर येत म्हणाली. तिला असं लगबगीनं बाहेर येताना पाहून स्वतः सोफ्यावर निवांतपणे टेकत बंडोपंत बोललेच, "आजी तुला काय कळतं गं क्रिकेट मधलं..."

लेख: 

ImageUpload: 

पटकथा सराव - 1

आपल्या मैत्रिणींपैकी काहींनी पटकथा शिबिरात भाग घेतला. काही कष्टाळू मुलींनी दोन्ही दिवस तर काही कमी कष्टाळूनी एक दिवस. तरिही सराव म्हणून आम्ही इथं छोटे सीन्स लिहायचं ठरवलं आहे. गोष्ट साधी आहे. तरी बघू कसं जमतंय इंटरेस्ट टिकवून ठेवायला. इथं काही नियम , पद्धती, शिकलेले मुद्दे वगैरे लिहीत नाही. ते चर्चा झाली तर येतीलच.
गोष्ट आपल्या लाकुडतोड्याची आहे. जमेल तुटकी रसाळ पणे, प्रेक्षकांना खुर्चीवर बसून राहायला भाग पाडेल अशी लिहीत राहायचं आहे.
सहभागी मुली.
अवल
विनी,
अगो,
अनु,
सन्मि

बाकी कुणाला लिहू वाटलं तरी लिहाच.

Keywords: 

लेख: 

जिंदगी ना मिलेगी दोबारा !!! स्टोक कांगरी ट्रेक आणि रोड ट्रिप - प्रवास

दुसरा भाग लिहायला वेळ घेतला खूप.. आणि भरपूर मोठा झालाय. काय ठेवावं आणि काय काढावं ह्याचा गोंधळ होऊ लागला मग आहे तसचं ठेवलं
तर आता प्रवास. ठाणे ते लेह. आम्ही बाय रोड जाणार होतो म्हणून २ दिवस आधी निघालो. आता आमच्या ग्रुप मध्ये प्रवासाची बरीच कॉम्बीनेशन्स होती. आम्ही पूर्ण बाय रोड. एक मोठा ग्रुप बाय एअर चंडीगढ , तिथुन पुढे बाईक्स. मात्र परततांना लेह हूनच बाय एअर. ह्या ग्रुपमधल्या दोघी जणी लेह ला पोहोचल्यावर पँगाँग लेक बघुन परत जाणार होत्या. आणि ५ जण डायरेक्ट लेह्ला येणार होते. थोडक्यात परत येतांना सगळे फ्लाईटनी पण आम्ही अर्थात बाय रोड.

पाने

हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle