कभी यूँ भी तो हो - ३

भाग २

दाराला कडी लावून तिथेच टेकून ती जरा उभी राहिली. छातीतली धडधड अजून पूर्ण थांबली नव्हती. मग बेडवर बसून तिने आधी पाण्याची बॉटल तोंडाला लावली. घटाघट थंड पाणी घशाखाली उतरल्यावर तिच्या हृदयाचे ठोके जरा शांत झाले.

आता तिचा मेंदू एकेक गोष्ट प्रोसेस करायला लागला.
नोटिफिकेशन १. हे मान्य करायला तिला खूप त्रास होत होता, पण या क्षणाला तिने टोटल माती खाल्ली होती. हा काही कोणी चोर, खुनी किंवा सिरीयल किलर नसून साधा अरुआंटीचा भाचा होता.

नोटिफिकेशन २. दुसरी तिच्या काळजात पार कळ आणणारी बातमी म्हणजे हा माणूस तिने आतापर्यंत पाहिलेला सगळ्यात देखणा, हँडसम नमुना होता. त्याचे शार्प फीचर्स, दाट रेशमी केस (ज्यातून तिला जाम बोटं फिरवावीशी वाटत होती), रुंद खांदे, जिमिंगची साक्ष देणारी मजबूत छाती आणि ऍब्ज!

आणि नोटिफिकेशन ३. त्याचे डोळे! मस्कारापण फिका पडेल अश्या लांब वळलेल्या पापण्या आणि डार्क चॉकलेटी रंगाचे चमकदार डोळे! जे तिला चेकआऊट करताना तिच्या अंगावर शहाऱ्यांची नक्षी उमटवत गेले होते. हे आठवूनही पुन्हा तिचे गाल जरा लाल झाले.

हा माणूस आपल्या फक्त एक भिंत पलीकडे झोपला आहे या विचारानेच तिची झोप उडून गेली होती. उशिरा कधीतरी हळूहळू तिचे डोळे जडावून बंद झाले.

सकाळी साधारण पावणेआठ वाजता तिला कानाजवळ काहीतरी हुळूहूळून जाग आली. ती आळस देत उठली तर तिच्या पोटावर एक पंजा टाकून जोईबुवा आरामात ब्लॅंकेटमध्ये घुसून तिचा गाल चाटत होते. हसतच उठून "यू नॉटी ओल्ड बॉय" ओरडत तिने त्याला उचलून खाली ठेवले आणि दार उघडले. जोईने लगेच उघड्या दारातून बाहेर सूर मारला. ब्रश वगैरे करून तिने टीशर्ट, स्लॅक्स चढवली. तिचे कुरळे केस उंच पोनीटेलमध्ये अडकवत ती बाहेर आली तेव्हा सगळीकडे सामसूम होती. टेरेसच्या सरकवलेल्या काचेकडून जोईचा आवाज येत होता.

तिथे पोचल्यावर समोर मोठ्या लालभडक फुलांनी भरलेल्या जास्वंदीच्या कुंडीखाली पसरून जोई त्याच्या डॉग डिशमधून बकाबक त्रिकोणी शेपचे किबल मटकावत होता. त्याच्या शेजारीच काळ्या गुबगुबीत फॅब्रिक सोफ्यावर इंद्रनील हातात एक ढब्बू मग घेऊन मन लावून ET वाचत बसला होता. कालचे फॉर्मल्स जाऊन आता तो शॉर्टस आणि टीशर्टमध्ये होता. टी शर्टच्या अवस्थेकडे पाहून कळत होते की तो नुकताच त्याची मॉर्निंग रन संपवून आलाय. 'ऊफ! हे हेल्थ फ्रीक्स' म्हणत मनातल्या मनात तिने डोळे फिरवले. त्याचे शॉर्टस घातलेले लांबलचक पाय आणि कोरीव पोटऱ्या बघून तिने एक खोल श्वास घेतला. 'ह्याला सगळ्याच शॉर्टस किती शॉर्ट होत असतील ना' तिच्या मनात विचार आला, 'नॉट दॅट आय माईंड!' म्हणत तिने स्वतःलाच डोळा मारला.

त्याच्या समोर टेबलवर ब्रेड, बटर, नाईसची साखर लावलेली बिस्किटं, चहाची केटल, दूध, साखर आणि अजून एक मग असा सगळा जामानिमा मांडलेला होता. ती दारात उभी राहून हा विचार करताना अचानक तिला दिसलं की तो पेपर बाजूला करून आपल्याकडे मजेत एक भुवई वर करून बघतोय. तिचं आपल्याकडे लक्ष गेलंय खात्री झाल्यावर तो जरा मोठ्यानेच "गुड मॉर्निंग!" म्हणाला. क्षणभर जोईनेही बिचकून मान वर करून पाहिलं पण काही इंटरेस्टिंग न दिसल्याने लगेच खाली मान घालून आपले चाप-चूप आवाज सुरू केले.

"गुड मॉर्निंग" म्हणत हसून ती त्याच्या समोरच्या सोफ्यावर बसली. "आय होप तुला मी केलेला चहा चालेल.. अदरवाईज आय एम व्हेरी स्केअर्ड ऑफ क्रिकेट बॅट्स हां! ह्या वाक्यावर दोघेही खळखळून हसले. "शुगर?" "एक स्पून".

"सो टेल मी, व्हाय अरुमासी हॅड टू लीव्ह सो सून? एनी प्रॉब्लेम? तिच्या हातात चहाचा मग देता देता जरा गंभीर होत त्याने विचारले.

"क्रिती हॅज सम हेल्थ प्रॉब्लेम अँड हर गायनो रेकमेंडेड बेडरेस्ट टिल ड्यु डेट. सो दे हरीड विदाऊट थिंकिंग एनीथिंग.." ती बोलत असताना त्याचा चेहरा जरा गंभीर झाला. "डोन्ट वरी, ती नीट आहे आता" म्हणत तिने जरा दिलासा दिला.

"ओह, मला माहित असतं तर मी जरा लवकर आलो असतो" तिच्या चेहऱ्यावरचं प्रश्नचिन्ह बघून त्याला लगेच कारण कळलं.
"डोन्ट बी सरप्राईज्ड! मराठी येतं मला थोडं थोडं. माझी मराठी टीचर चांगली होती. बॉर्न अँड ब्रॉट अप इन बॉम्बे."

"मुंबई!"

"येस, मुंबई!" म्हणून त्याने हसत तिला अंगठा दाखवला.

"सो, मी गेले दहा दिवस सिंगापोरमध्ये होतो. I work in advertizing so always on my toes, client visits n all.. कालच मुंबईत उतरून कॅबने डायरेक्ट पुण्याला आलो, सरप्राईज व्हिजिट म्हणून. मासीला त्रास नको म्हणून गुपचूप मॅगी खाऊन झोपणार होतो तेवढ्यात माझ्यावर अटॅक झाला! सॉरी, यू मस्ट बी स्केअर्ड..

"इट्स ओके, खरी भिती तुला वाटायला हवी होती!" ती डोळे मोठे करत म्हणाली आणि तो पेपर तोंडासमोर धरत हसायला लागला.

बाहेर कोवळ्या उन्हात रिमझिम पाऊस सुरू झाला होता..

भाग ४

Keywords: 

लेख: