सृजनाच्या वाटा - क्रीडा-जगत

सृजनाच्या वाटा - क्रीडा-जगत

ऑगस्टमध्ये क्रीडा जगतातला सर्वात मोठा सोहळा होतो आहे. समर ऑलिंपिक्स! ५ ऑगस्टला रिओ, ब्राझिल इथं उद्घाटन सोहळा आणि त्यानंतर क्रीडाप्रेमींना पर्वणीच असे दोन आठवडे! यानिमित्त मैत्रीणवर सोहळ्याचे, त्यातल्या स्पर्धांचे धागे निघतीलच पण "सृजनाच्या वाटा" उपक्रमामध्ये ऑगस्ट महिन्यासाठी यानिमित्ताने खालील विषयांवर मैत्रीणींनी लेखन/रेखाटन करावं असं आवाहन करत आहोत-

१. शाळा- कॉलेजात खेळलेला/खेळत असलेला खेळ
२. आवडता/आवडते खेळ
३. आवडता/आवडते खेळाडू
५. लहानपणीचे खेळ, आठवणी
४. स्वतः तयार केलेला खेळ
५. खेळांची चित्रे, फोटो.
६. खेळ आणि पैसा
७. खेळातलं राजकारण
८. खेळांचे साहित्य
९. खेळ आणि टेक्नॉलॉजी

हे फक्त सुचवलेले विषय आहेत. याशिवाय खेळांच्या इतर पैलूंवर तुम्हाला लिहायचे असेल तरी लिहू शकता.
यात मैदानी, इन्डोअर, बैठे खेळ अगदी पत्ते, सागरगोटे, लपंडाव इ. कसलेही खेळ येऊदेत. चारचौघात खेळता येण्यासारखे असले म्हणजे झालं! :)

sports.PNG

Keywords: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle