माझे रिसायकलिंग /अप्सायकलिंगचे प्रयोग - ३

माझ्ं सध्याचं सगळ्यात आवडतं रीसायकलिंग मटेरिअल आहे 'प्लॅस्टीक'.खरतरं 'प्लॅस्टीकची बिसिलरी किंवा तस्सम ब्रॅंडची बाटली. एका रोड ट्रीपमधे पाण्याच्या बॉटल्सचा क्रेट घेतला होता. ट्रीप संपता-संपता सगळ्या रिकाम्या बॉट्ल्स रिसायकलिंग बीन मधे टाकता येतील म्हणून गोळा करुन एका पिशवीमधे ठेवलेल्या. घरी परत आल्यावर इतर बॅग्स बरोबर बॉट्ल्सची पिशवी पण घरात आणली. मात्र पुन्हा बाहेर जायचा कंटाळा केला आणि थोड्या वेळाने टाकता येईल म्हणून एका कोपर्‍यात ठेऊन दिली. ते पाहून लेकीने विचारलं 'आई , तू बॉट्ल्सचं प्रोजेक्ट करणार आहेस का? ' ते ऐकताक्षणी माझ्यातला रिसायकलिंग फॅन पुन्हा जागा झाला आणि पिशवी पाठीशी टाकून त्या बॉट्ल्स ठेवण्यासाठी स्टोरेजकडे जाऊ लागला :ड

प्लॅस्टीकच्या बाटली पासून एखादं विंडचाईम करता येईल इतकचं पहिल्यांदा सुचलं होतं ,मग तुनळीवर शोध घेतल्यावर बाटलीच्या झाकणाकडील बाजू वापरुन सुरेख फुलं बनू शकत हे कळल्यावर विविधरंगी फुले झरझर बनवली.
IMG_20160529_224456791.jpgb1.png
ही मी सगळ्यात पहिल्यांदा बनवलेल्या फुलांची फ्रेम.
upcycle1_edited.jpg
खूपशी फुलं बनली की त्याचे काही काँबिनेशन्स ट्राय केले
IMG_20160617_145536.jpg
हे आणखी एक.ते भिंतीवर करुन पाहायच होतं पण आधी फ्लोअरवर केलेला प्रयत्न
IMG_20160527_154727234.jpg
विंडचाइम्सचं तोरणं
IMG_20160617_154546107.jpg
नंतर फक्त फुलं बनवत राहायचा कंटाळा आल्यावर काहीतरी सोप्प करुन पाहीलं. बॉटल्सचीचं फुलं बनवली
IMG_20160514_014240.jpg
आणि ह्या फुलांना देठ म्हणून बॉट्ल एकमेकात बसवून पाईप तयार केला
IMG_20160514_014552.jpg
हे नो ग्लु पाम ट्री
IMG_20160512_222943757.jpg
आणि हे दोन बॉट्ल्सचे लँप्स. मधे टिश्यु पेपरचा रॉड आहे. पहिल्या लँपची उंची साधारण ४ फुट आहे
pixlr_20160505015843335.jpg
आणि हा दुसरा साधारण फुटबॉल पेक्षा थोडा मोठा
13133116_1001590943211043_6079609391800639783_n.jpg
एक छोटस तोरण ट्राय केलं
IMG_20160514_014522.jpg
ह्या मागच्या काही महिन्यांत केलेल्या वस्तु. त्या करताना एन्ड प्रॉडक्ट पेक्शा बनवायच्या प्रोसेसमधे जास्त मजा आली. आणि बहुतेक रंगकामामधे लेकीला सोबतीला घेतलेलं , त्यात तीने तर एन्जॉय केलं पण मलाही छान वाटलं

महिन्याभरापुर्वी पुण्यात परतोनि आलो तेव्हा आवराआवरी करताना ह्या वस्तुंचं काय करायचं हा प्र्श्न होताच. पण काही निवडक गोष्टी आसपासच्या काही मैत्रीणीं अगदी स्वतःहून घेउन गेल्या:) एकीने ती फुलांची फ्रेम घरात लावली आहे :)

आणखी काही २-३ फोटो आहेत. ते नंतर डकवेन

Keywords: 

कलाकृती: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle