upcycling

माझे रिसायकलिंग /अप्सायकलिंगचे प्रयोग - ३

माझ्ं सध्याचं सगळ्यात आवडतं रीसायकलिंग मटेरिअल आहे 'प्लॅस्टीक'.खरतरं 'प्लॅस्टीकची बिसिलरी किंवा तस्सम ब्रॅंडची बाटली. एका रोड ट्रीपमधे पाण्याच्या बॉटल्सचा क्रेट घेतला होता. ट्रीप संपता-संपता सगळ्या रिकाम्या बॉट्ल्स रिसायकलिंग बीन मधे टाकता येतील म्हणून गोळा करुन एका पिशवीमधे ठेवलेल्या. घरी परत आल्यावर इतर बॅग्स बरोबर बॉट्ल्सची पिशवी पण घरात आणली. मात्र पुन्हा बाहेर जायचा कंटाळा केला आणि थोड्या वेळाने टाकता येईल म्हणून एका कोपर्‍यात ठेऊन दिली. ते पाहून लेकीने विचारलं 'आई , तू बॉट्ल्सचं प्रोजेक्ट करणार आहेस का?

Keywords: 

कलाकृती: 

उतू नका मातू नका फुकट काही घालवू नका - रिसायक्लिंग किंवा अपसायक्लिंग

विनीचा अपसायक्लिंगचा धागा आल्यापासुन डोक्यात होतं की एक कॉमन धागा काढूया, कारण आपण सगळेच काही ना काही रिसायक्लिंग किंवा अपसायक्लिंग करत असतो आणि आपण बनवलेल्या कलाकृतीचा आपल्याला मनोमन अभिमानही वाटतो. पण आपण प्रत्येकीने स्वतःच्या वस्तुंचा वेगळा धागा काढून त्यात फोटो टाकावेत एवढ्या क्वांटिटिमध्ये नसतात आपल्या वस्तु हे आपल्यालाही माहित असतं सो आपण बनवलेल्या अशाच थोड्या फार अपसायक्लिंगसाठी हा धागा वापरुया.

Keywords: 

माझे रिसायकलिंग /अप्सायकलिंगचे प्रयोग - २

बेकरी प्रॉडक्ट्स सोबत माझा मजेदार खेळ सुरु असतो. ठरवलं तर बिस्कीटं, ब्रेड, खारी, केक, नानकटाई अशा चविष्ट गोष्टींपासून मी आरामात दूर राहू शकते पण एखाद्या बिस्किटाची किंवा केकची चव आवडली तर मात्र एखादा बाईट घेऊन सोडणं महाकठीण काम होतं. त्याचा पॅक संपल्या शिवाय चैन पडत नाही

Keywords: 

कलाकृती: 

माझे रिसायकलिंग /अप्सायकलिंगचे प्रयोग - १

शाळेत असताना कधीतरी 'टाकाऊ पासून टिकाऊ' सदरातली कृती वाचून वस्तू बनवायचं वेड लागलेलं. घरात येणारे विविध प्रकारचे पॅकेजिंगचे कागद, खोकी अशा विविध उपयोगी वस्तू गोळा करुन ठेवायच्या आणि कधी आकाशकंदील तर कधी तोरणं असं काही ना काही बनवलं जायचं. मागच्या वर्षी लेकीला तीची सगळी खेळणी आणि ती स्वतः बसू शकेल अशी टॉय कार हवी होती. :) एका मोठ्या खोक्यापासून तीला हवी तशी कार बनवली आणि त्यानंतर अपसायकलिंगच्या छंदाने पुन्हा डोकं वर काढलयं.त्यातल्या काही प्रयोगांचे हे फोटो. माझ्या या छंदाच्या नुतनीकरणास कारणीभूत ठरलेली टॉय कार पावसाने भिजून गेल्याने तीचा फोटो नाही पण त्यानंतरच्या प्रयोगांचे फोटो आहेत.

Keywords: 

कलाकृती: 

Subscribe to upcycling
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle