लाराने केलेले DIY - inspiration board

रायगडनं तिच्या भाच्यांना विचारलं की अमेरिकेहून काय पाठवू? झालं! लारादेवींनी एक मोठ्ठी लिस्ट करून तिला पाठवली. लिस्ट म्हणजे केवळ क्राफ्टच्या सामानाची. भेट मिळाल्यावर जाम खुष झाली ती कारण ती केव्हाचा शोधत असलेला रोज गोल्ड स्प्रे होता.

तोच स्प्रे वापरून तिनं हा नेहमीचा रायटिंग बोर्ड एका इन्स्पिरेशन बोर्डमधे रुपांतरीत करून तिच्या अभ्यासाच्या खोलीत लटकवला आहे. एका साध्या पॅडला रोझ गोल्ड रंगाच्या स्प्रेनं स्प्रे पेंटिंग करून घेतलं.

Photo:

In your eyes the flames of the twilight fought on - पाब्लो नेरुदा. सध्या शाळेत पाब्लो नेरुदांचे ओड्स शिकवत आहेत त्यातील एक ओळ इथे लिहिलीये. हा काळा चौरस म्हणजे स्टिक ऑन फळा आहे. त्यामुळे त्यावर काही बाही लिहून ते पुसून पुन्हा दुसरं काहीतरी लिहिता येईल. अक्षराकडे बघू नका. :)

Photo:

तसाच शेजारी अजून एक छोटा फळा. Darling you are a work of art

Photo:

तो पिनबोर्ड एका क्विलिंगच्या सेटमधून कापून लावला आहे आणि त्यावर काही चमकदार वाक्यांच्या / शब्दांच्या पिना आणि बटणं लावली आहेत.

Photo:

बाकी असेच काही तिचे आवडते आकार वगैरे चिकटवून सजवलेला हा बोर्ड.

Photo:

Keywords: 

कलाकृती: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle