माझे पुस्तक(सह)जीवन

मानवी संस्कृतीमधे साहित्याचा फार मोठा आणि महत्वाचा सहभाग आहे. अगदी लेखन कला अस्तित्वात नव्हती; तेव्हाही साहित्य निर्माण होत गेले. असं मानतात की गोष्ट सांगणं अगदी रानटी जीवनापासून चालू आहे. गुहेतला माणूस गोष्टी सांगत होता आणि चित्र काढून गुहेच्या भितींवर जतनही करत होता. या गोष्टींमधूनच मानव शिकत गेला, आपले अनुभव पुढच्या पिढीपर्यंत पोहचवत राहिला. मानवी संस्कृतीची ती सुरुवात होती.

आपल्या आयुष्यातही हे साहित्य, असेच महत्वाची भूमिका बजावत असतं. अगदी लहानपणापासून गोष्टी गाणी, पुस्तकं आपल्याला घडवत असतात. चला तर या घडण्याबद्दल आपापले अनुभव शेअर करुयात! "मला साहित्याने कसे घडवले" या बद्दल लिहुयात. लहानपणापासून वाचनाची निर्माण झालेली आवड, वाचलेली पुस्तकं, त्यांनी आपल्यावर पाडलेला प्रभाव, आपली जडणघडण आणि पुस्तकं यावर लिहुयात!

वर
0 users have voted.