जागतिक महिला दिन

८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करतात, सर्वांना माहित असेलच... लवकरच हा दिवस येत आहे... आमच्या परिवारातील आम्ही सगळ्या महिला या दिवशी एकत्र बाहेर जेवायला जातो आणि विशेष म्हणजे आम्ही सर्वजणी सारखे ड्रेसेस घालतो... खूप मज्जा करतो... हा उपक्रम गेले काही वर्षे चालू आहे... त्यात सगळी नाती एकत्र येतात आई - मुलगी, बहीण, सासू- सून, आत्या, मावशी, जावा- जावा.... जवळ जवळ तीन पिढ्या एकत्र येतात. सर्व काही छान वाटते.

पण हे सगळं करताना एक गोष्ट नेहमी विचार करण्यास लावते, आपण सुसंस्कृत घराण्यातून आलो आहोत म्हणून आपल्याला हे स्वातंत्र्य मिळते, पण समाजात अजूनही महिलांना दुय्यम स्थान आहे, मग त्या कोणत्याही गटातील असोत.

आपल्याला सर्वांनाच माहीत आहेत त्या समस्या, विशेषतः भारतीय महिला, मग त्या सुशिक्षित असोत वा अशिक्षित... त्यांना सेक्शुअल हॅराससमेन्टलाही सामोरे जावे लागतेच. हल्लीच मी फेसबुक वर वाचले होते की एक महिला आपली सरकारी नोकरी सोडून, अबला/ मतिमंद स्त्रियांचं पुनर्वसन करण्याचं कार्य करते आहे... आणि नोकरी सोडायचा निर्णय तिने पाहिलेल्या एका प्रसंगावरून घेतला. तिने एका मतिमंद स्त्रीला एका विचित्र अवस्थेत पाहिले, त्या स्त्रीच्या अंगावर पूर्ण कपडेही नव्हते. कोण्या पुरुषाने तिच्यावर अत्याचार केल्यामुळे ती गरोदर होती. वाचून माझ्या अंगावर काटाच आला..

असे प्रकार समाजात चालूच असतात. आपल्याला सर्वांनाच समाजासाठी काहीतरी करायचे असते. मग निदान असे काही समोर आले तर एक पाऊल पुढे करून मदतीचा हात तरी आपण देऊ शकतो. हे सगळं केव्हा थांबेल माहित नाही, पण प्रत्येक स्त्रीने स्वतःचे संरक्षण करणे आणि आपल्या डोळ्यांदेखत जर कोणी काही अनुचित कॄत्य करत असेल तर ते रोखण्याचा निदान प्रयत्न तरी करावा...

बरेच वेळा आपल्यासारख्या नोकरी/ स्वव्यवसाय करणाऱ्या महिलांनादेखील सेक्शुअल हॅराससमेन्टला सामोरे जावे लागते. प्रवासात, ऑफिसमध्ये विविध ठिकाणी.

मी ट्रॅव्हल अँड टूरिझम या क्षेत्रात स्वव्यवसाय करणारी एक महिला आहे.. बरेच जण म्हणतात की हे क्षेत्र महिलासाठी योग्य नाही... पण मला वाटते की असे का? का नाही आपण या क्षेत्रात उडी घ्यायची?

हो, एक गोष्ट आहे, नवीन नवीन अनुभव तर येतच असतात, आपण व्यावसायिक दृष्टिकोनातून कॉन्टॅक्ट शेअर करतो पण त्याचा काही जण गैरवापर करतात... व्यावसायिक चर्चा करायची हे निमित्त पुढे करुन भेटायचं आहे असं म्हणतात पण त्यांचा उद्देश हा वेगळाच असतो. त्यामुळे सतत अ‍ॅलर्ट रहावेच लागते. बरेच वेळा ह्या अशा पुरुषांना ओळखणेसुद्धा कठीण असते. आपण स्वतंत्र स्त्री, सुशिक्षित, त्यामुळे सहजतेने पुरुषांशी संपर्क करतो (कॉर्पोरेट वूमन म्हणून) पण ते तितके साधे सोपे नाही.

असो खूप काही बोलण्यासारखे आहे या विषयावर, पण मी एकच विचार मांडण्याचा प्रत्यत्न करते की स्वतःची काळजी घ्या, अन्याय सहन करू नका आणि कोणावर अन्याय होत असेल तर गप्प राहू नका....

फक्त ८ मार्च या दिवशीच नाही तर प्रत्येक दिवशी महिलांना स्वाभिमानाने जगता आले पाहिजे.

आता सज्ज व्हा आणि एकट्या कुठेही जगभरात प्रवास करायला घाबरू नका, बिनधास्त भटकंती करा...

कवी

Keywords: 

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle