निमित्त

आपण बोललो... भेटलो... स्वप्न पाहू लागलो...
वाटलं सापडलच मला माझं Wonderland!
तुझ्यात!
मग ती नव्याची सर ओसरली...
Wonderland सारख काही दिसेना तुझ्या डोळ्यात!
मग वाटायला लागल तू तो रस्ता असणार
मला माझ्या Wonderland कडे नेणारा...
पुन्हा नवा उत्साह त्या अस्फुटा कडे धावण्याचा!
चकवा लागल्या गत मी गोल फिरून तिथेच पुन्हा!
Wonderland न सापडलेली Alice!
तू फक्त नव्याने दुःखाचं कारण होत राहीलास...
मग अगदी अगदी वीटच आला या दुखावल जाण्याचा !
आणि मी काढून घेतले हक्क मला दुखवण्याचे
तुझ्या कडून... घरा कडून... आपल्यां कडून ...
परक्यां कडून आणि अगदी स्वतः कडून सुद्धा!
मग काही कारणच नाही राहीलं मन हुळहुळायच...
शांत झालं सारच... हसरं...हवहवस... प्रसन्न ... कायमचं
आणि मग सापडलच मला ते Wonderland
माझ्यातच!
तरिही हे Thank you तुलाच
तू नक्कीच ते निमीत्त आहेस
मला Wonderland शोधायला भाग पाडणारं!

/* */ //