हॅरी पॉटरवर बोलू काही...

हॅरी पॉटरचा विषय निघाला आणि एक भलत्याच विषयाचा धागा त्याने हायजॅक केला. कारण आमचा हॅरी आहेच जगात भारी!
या सिरीजमधलं पाचवं पुस्तक येणार होतं, तेव्हा त्यावर पेपरमध्ये वगैरे बरीच चर्चा चालू होती. मला कळेना इतकी चर्चा का? माझ्यासरख्याच वाचनवेड्या भावाला विचारलं तर त्याने surprise करत, तू अजून नाही वाचलेलं? असं विचारलं आणि मग बरच कौतुक ऐकवलं. मी उत्सुकतेनं पहिलं पुस्तक आणलं लायब्ररीतून, आणि पार झपाटले त्याच्या जादूने. पाचवा भाग प्रकाशित व्हायला आठवडा होता तेवढ्या काळात मी आधीचे चार भाग वाचून काढले. आणि पाचवं पुस्तक यायच्या दिवशी लायब्ररीच्या दारामधे ती उघडायच्या आधी अर्धा तास जाऊन बसले. biggrin
असो, या विषयावर मी कितीही लिहू शकते. tongue माझ्यासारख्या अनेक जणी असतील इथे. तर या,
हॅरी पॉटर सिरीजबद्दल बोलू, त्यावरच्या अनेकानेक थिअरींबद्दल बोलू, आवडलेलं काही फॅनफिक्शन असेल तर शेअर करू, कॅरेक्टर्सबद्दल चर्चा करू... कीस पाडू या winking

इमेज क्रेडिट http://www.carcanyon.com/harry-potter-order-of-the-phoenix-animated-by-s...

/* */ //