आता वंदू तुज मोरया

आता वंदू तू मोरया

तिळी चतुर्थीचा दिवस. आम्ही अशोकनगरवासी ( म.प्र. ) महाराष्ट्रीयन मंडळी जवळील 'शाढोरा'
गावातील गणपती मंदिरात बाप्पाच्या दर्शनास अगत्याने जायचो.ज्यास ज्या बसने, ट्रेनने किंवा स्वत:च्या
वाहनाने जसे जमेल तसे. क्धीत्यास छोट्या सहलीचे रूप यायचे. मंदिर पेशवेकालीन आहे. जवळ मंदिराची
शेतजमीन ,आमराई पण आहे.
त्यावर्षी मुलांच्या शाळेत परीक्षा व ह्यांना सुती घेता येणार नव्हती.मुलं व त्यांचे वडील घराबाहेर पडल्यावर
आपण 'श्री गजानन विजय 'या ग्रंथाचे पारायण करावे असे मी मनातच ठरविले.त्याप्रमाणे तयारीस लागले.
अकराच्या सुमारास पोथी परायानास सुरवात केली. दोन वाजता दरवर टक्-टक् चिर परिचित.ह्यांचीच.आता
देवाला क्षमा मागून हात जोडले अन् उठले.
ह्यांनी सांगितले मी आर्धी सुटी घेऊन आलोय.चला आपण दोघेच गणपतीला चलू.मी पारायण करतेय
हे जाणून ते एकटेच शाढोऱ्याला निघाले.देवास नमस्कार करून पुढे वाचन सुरु केलं.४:३० ला मुले परतली.
पुन्हा वाचनात खंड पण अपरिहार्य.मुलांचे खाणे-पिणे केलं.मोदक भाजी-पुरी असा रात्रीचा स्वयंपाक करून
मुलांना अभ्यासास बसवून, समजून उर्वरित पोथी वाचन सुरु केलं. पारायण झालं.मुलांना हाक मारली ,
आरती सुरु करणार इतक्यात त्यांचे बाबा परत आले.न बोलता पाय धुवून आरतीस उउभे राहिले.प्रसाद
वाटला. आणि ह्यांनी सांगायला सुरवात केली. त्यांच्याच शब्दात ___
"मी घरून निघालो लगेचच बस मिळाली.बसमध्ये मी धरून सहा -सात प्रवासी होते. बस शाढोऱ्याच्या
अगदी जवळ म्हणजे दहा मिनिटं आणखीन लागली असती इतकी! रस्त्यावरून बस खाली उतरली,
समोरच्या झाडावर आपटली.झाड खूप मोठे नसल्याने कोसळले ,बस केवळ वेडीवाकडी झाली.थांबली.कोणाही
प्रवाशाला काहीही इजा झाली नव्हती.परंतु अल्पावधीतच बरीच गर्दी जमली.विशेष म्हणजे मंदिराचे गुरुजी
बरोबर एक दोघे जणांना घेऊन हजर. बसमध्ये अशोकनगरचे कोणी प्रवासी असतील म्हणून.विचारपूस
झाली..सुरक्षित होतो.' जय गजानन ' देवाचे आभार,देवदर्शन - आरती -प्रसाद यथासांग करून परतलो."
चंद्रोदयास काहीसाच अवधी होता.सकाळ पासून पारायण करायचे म्हणून मी पाणी सुध्दा घेतले नव्हते.
एका बैठकीत पारायण पूर्ण झालं नाही तर नाही पण पूर्ण व्हावे ह्या जिद्दीने केले म्हणा किंवा करून घेतले
म्हणा गजानन महाराजांनी !! शिवाय प्राणावर आले होते ,पण झाडावर निभावले.तेही त्यांच्याच कृपेने.
कोणती ती शक्ती सूचना देत असते पण आम्हा पामरांना ती कशी उमजवी ? अशी ही चतुर्थी
' निर्जला चतुर्थी 'घडली. उपवास सोडतांना मी फक्त मोदक खाल्ला व पाणी प्याले.पुढे एकवीस निर्जलाचतुर्थी
चे व्रत केले.
मध्यंतरीच्या काळात म्हणजे व्रत पूर्ण होईपर्यंत ज्या ज्या वेळी चतुर्थीच्या दिवशी जमलं तेव्हां बसने
तर पुढे 'हिरो मेजेस्टीक' ने आम्ही दोघे शाढोऱ्यास दर्शनास जात असू.परीक्षा अजून संपली नव्हती.तशी तशी
रोजच एक....एक....परीक्षा आपण देत असतोच.
असेच एकदा दर्शन करून परत निघालो. रस्त्याच्या दुतर्फा हिरवीगार शेते .संध्याकाल व्हायला आलेली,
गार वारा. अशा सृष्टी सौंदर्याचा आनंद घेत जरा छान मूड मध्ये चाललो होतो. अन् .......
गाडी मध्येच थांबली.कां ?कारण विचारले तर ..काही कळत नाही..बुवा..असे उत्तर !पुन: पुन:किक्
मारणे सुरु.आणि ती सुरु व्हायचं नाव घेईना.अडेलतट्टू..मग आता काय ? पदयात्रा -हातात गाडी घेऊन चालू.
नेहमीचा एवढा वाहता रस्ता पण एक बैलगाडी,ट्रक्टर ,बस कोणी वाटेवर फिरकेना.पुन्हा एक, दोन, तीन...
किक् मारणे. प्रयत्नास यश नाही. आधी नाव घ्यावे मग पाउल उचलावे.पुढे जात होतो असा प्रयत्न ७-८
वेळा तरी केला असावा.दोन-अडीच कि.मी.अंतर चालणं झालं असावं.आता अंदाजे ३ कि.मी.अंतरावर
अशोकनगर दूर राहिले असावं.
कर् र् sकच् एक मोटरसायकल जवळ उभी. चालकाने व्विचारले आम्ही सांगितले ' पुराण.'
बघा बरं पुन्हा प्रयत्न करून अस्म त्याने म्हणताच ह्यांनी ऐकले--आज्ञा शिरसावंद्य .काय आश्चर्य
गाडी चलू झाली.मी पण बसले प्रवास सुरु चुपचाप. काही अंतर ठेवून मोटरसायकल मागेमागे येत
होती अजूनही अन्य कोणत्याही प्रकारचे वाहन अथवा वाटसरू भेटला नव्हता.अशोकनगर आल्याच्या खुणा
दुध डेयरी वगैरे दिसताच मोटारचालकाने ' ठीक है साहब' म्हणत सुसाट गेsला. गायब झाला.
'अरे अरे, हाकांचा काही उपयोग नाही. हा कोण होता ?
'मूषक वाहन गणपती !' असच वाटतय ना ?
दुसऱ्या दिवशी नेहमीच्या मेकेनिक कडे गाडी नेली. खराबी असलीच तर ठीक करावी म्हणजे पुन्हा त्रास
नको व्हायला . साहेब गाडी तर ऑलराईट असा रिपोर्ट मिळाला. नवल! नवल !
निष्कर्ष एवढाच प्रक्षा पहाणारा ,मदतीचा हात पुढे करणारा, परीक्षेत यश देणारा वरवे सेवा तूच गजानना !
आता वंदू तुज मोरया .

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle