हिरव्या टोमॅटो ची चटणी

आपण हिरव्या टोमॅटो ची भाजी वरून किसलेले खोबरे पेरून नेहमी करतो.. ही चटणी नेहमीच्या सॉस ला पर्याय आहे. टिकण्यासाठी फ्रीज मध्ये ठेवावी लागेल.करायला अतिशय सोपी आहे.
साहित्य :—२५० ग्रॅम किंवा ४ हिरवे टोमॅटो
२ टे.स्पू. तीळ, १ टे. स्पू.तेल
१ टी स्पू. जिरे - मोहोरी, १/२ टीस्पू हिंग , हळद
१ टे स्पू प्रत्येकी धणे जिरे पूड आणि गरम मसाला
२ टे स्पू गूळ/ साखर , चवीनुसार तिखट व मीठ
नेहमी प्रमाणे तेला ची फोडणी करून त्यात तीळ व टोमॅटो च्या फोडी घालुन परता. धणे- जिरे पूड , गरम मसाला, तिखट, मीठ, गूळ घालुन परता. एक वाफ येऊ द्या .पाउण वाटी पाणी घाला. कढई वर झाकण आणि त्यावर थोडे पाणी घालून मध्यम आचेवर भाजी शिजु द्या. तयार भाजी थंड झाली कि मिक्सर मधुन फिरवुन घ्या. चव पहा. जर टोमॅटो गोड असतील तर लिंबाचा रस घाला.
ह्यात तीळा ऐवजी दाणे, खोबरे, डाळे वापरता येईल. तसेच कढीपत्ता, हिरवी मिरची, लसूण ( हिरवी पात / कळी) वापरता येईल .

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle