कोलंबस वारी - १

पूर्वतयारी 
मैत्रीण वरच्या अनेक मैत्रिणींनी कित्ती मदत केली, माहिती पुरवली. आणि जुलै मधे नाही पण ऑक्टोबर मधे अखेर मी लेकाकडे पोहोचले. अगदी व्हिसा काढण्यापासून विमानात बसण्यापर्यंत  बस्के, मृदुला, धारा, स्वाती २, सायो, रायगड, गौरी, मिनोती,  मोनाली,  लोला, मी अनु, आशुडी, चना, विनी, कविता, सन्मि, अकु,... सगळ्यांनी माझं येणं इतकं म्हणून सुकर केलं. तुम्हा सगळ्यांना थांकु थांकु थांकु Bighug

तर ऑक्टोबर मधे माझी व्हिसा मोहिम सुरु झाली. सगळी कागदपत्र, सगळा अभ्यास करून इंटरव्ह्युला गेले. धडधडताच इंटरव्ह्यु दिला. :uhoh: समोरून अजुन प्रश्न असतील असा वाटत असतानीच  व्हिसा प्रोसिझर पूर्ण झाली असं ते म्हणाले. मी विचारलं म्हणजे अॅप्रृव्ह? तर हसून झाली पूर्ण प्रोसिजर म्हणाले :thinking: पण पासपार्ट परत दिला नाही. सो झालं होत बहुदा :ड अन मग यथावकाश व्हिसाच्या शिक्यासह पासपोर्ट होती आला.

खरं तर अगदीच सोपं प्रकरण आहे. मी उगाचच इतकी घाबरत होते. तेव्हा नवीन कोणी जाणार असेल तर माझ्या अनुभवाकडे बघा. मला हे सगळं जमलं म्हणजे कोणालाही जमेलच Thumbsup व्हिसा झाला, टिकिट काढलं. आता प्रत्यक्ष प्रवास अन त्याची तयारी. पण मग पुन्हा सगळ्या मैत्रिणी धावल्या मदतीला. विमानात काय घाल, बरोबर काय ने, काय नको नेऊ इथपासून काय बोल, काय नको बोलू इथपर्यंत सगळं स्पूनफिडिंग होऊन अखेर मी निघाले.

तर मी पोहोचले या सगळ्या शिदोरी सह निघाले, आणि एकही अडचण न येता शिकागोला पोहोचले. उगाचच घाबरत होते. सगळं एकदम स्मुथली पार पडलं. Dancing अमेरिकन्सचं बोलणंही नीट समजत होतं. विमानात मी जास्तीकरून झोपूनच घेतलं. विमानात मी स्वेटर घातलाच नाही एक स्कार्फ होता तो पुरला. पिक्चर एकही बघितला नाही. सगळे बघितलेले ऑर फारच नवीन  106

विंग्रजी एक बघायला सुरुवात केली पण मग कंटाळा आला मग बंदच करून टाकलं. न झोपले मस्त विमान प्रवास मात्र छान झाला. मधे दोनदा जरा ढग, हवेच्या पोकळ्यांनी हलवलं, पण इट्स ओके. पायाचे मधूनमधून केलेले व्यायाम आणि चालणं यामुळे पाय एकदम ठिक राहिले. बुटं मात्र अजिबात काढली नाहीत. उशा, शाल दिलेली विमानात सो कंफर्टेबल होतं सगळं. मला नवऱ्या ने समोर भरपूर लेग स्पेसवाली सीट घेऊन दिलेली. सो सगळं छान पार पडलं.

मी मॅक्स मॅपच बघितला. कोणत्या देशावरून चाललोय,   अरे वा इथला हा इतिहास वगैरे विचार करत आले.
शिकागो जवळ आलं तसं  विमानातून बाहेर थोडा उजेड दिसू लागला. बघितलं तर आधी वाटलं समुद्र दिसतोय. पण मग लाटा हलत का नाहीत असा गांवंढळ प्रश्न मनात आला. Heehee मग लक्षात आलं अरे हा ढगांचा समुद्र आहे. कसले ढग! ते बंपिंग लॉन असतं न तसे ढग. गच्च भरलेले चिकटून चिकटून पुंजकेच्या पुंजके आणि मग समोरच्या क्षितीजावर एक लकेर उठली अंधूकशी किनार दिसू लागली

मग तिथे अक्षरश: इंद्रधनुष्य उगवलं. खाली लाल मग नारिंगी,पिवळा, हिरवा, निळा अन वर गडद्द जांभळा! वर खूप स्वच्छ हवा असल्याने असेल पण खरच असा सुर्योदय मी कधीच बघितला नव्हता. इंद्रधनुष्य फक्त पावसात आकाशात बघितलेलं. पण असं क्षितिजाशी? फारच अफलातून होतं ते दृष्य.
मोबाईलच्या कॅमेरात 10% ही नाही पकडता आलं ते!



आणि मग थोड्या वेळाने ढग मधे आले. आता मधेच एक किनार झळझळतीत  पिवळा अन वर खाली काळं. जणुकाही आगीची आडवी ओळ सळसळत ढगातून जात होती. ढगांमागून पिवळा उजेड लकलखत होता. मधेच एक बारीकसा रेघेसारखा पण पसरट ढग झरझर पळत गेला. फोटोत नाही पकडता आला. मग पुन्हा ढगांची, पांढऱ्या शुभ्र ढगांची दुलई खाली दिसू लागली. मधेच ती विरळ होई. मग खालचा अमेरिका हळूच दर्शन देई.



आखिव-रेखीव शहर! सरळ, काटकोनातले रस्ते, त्यात नीट आखून काढलेली  घरं, त्यांच्या ओळी आडव्या उभ्या. सरळसोट रस्ते, पळणाऱ्या इटुकपिटुक गाड्या मधेच सगळं अदृष्य होई. पुन्हा ढग ढग आणि ढग. मग शिकागो जवळ आलं तशी विमान अजून खाली उतरलं आता गाड्या त्यांचे रंग दिसू लागले, मी लगेच निखुची गाडी शोधू लागले :fadfad:

नंतर नवऱ्याने सांगितलं. माझं विमान आणि निखुची गाडी इतकं सिंक्रोनाईजली चाललेलं! आमच्या विमानाला शिकागोला पोचायला एकतास 10 मिनिटं होती अन निखिलची गाडी पोचायला एक तास 11 मिनिटं होती. तंत्रज्ञानाची कमाल! निखिलचं कोलंबस टू शिकागो लाईव्ह लोकेशन आणि माझ्या विमानाचे लाईव्ह लोकेशन नवरा पुण्यात बघत होता Thumbsup

मग विमान अजून खाली आलं,अन जमिनीवर आलं. शिकागो विमान तळ, किती प्रचंड मोठा आहे. दिल्ली पेक्षाही कितीतरी
तिथली सिस्टिम एकदम मस्त. विमानातून बाहेर आल्याबरोबर एक अमेरिकन मुलगी सगळ्या भारतियांना ओळखून " एका मागोमाग एक, उजवीकडून चला" अशी प्रेमळ धमकावणी सतत करत होती :ड मग कस्टम्सची रांग. पण तेव्हा आमचं एकच विमान आलं होतं, सो तिथले 5-6 काऊंटर उघडले गेले. अन पटापट आमचे कस्टम्स झाले

शिकागोत कस्टम्स वगैरे एकदम सोप्प. तिथल्या अधिकाऱ्याने 3-4 च प्रश्न विचारले. किती दिवस रहाणार विचारलं. आणि शिक्का मारून त्यावर 25 नोव्हेंबर2018 असं लिहिलं सही करून.अता वर्षभर राहू की काय इथे Heehee
बॅगा नीट आल्या. त्या काही त्यांनी तपासून बघितल्या नाहीत. डायरेक्ट बाहेर आले तर लेक समोरून धावत आला Bighug उतरल्यावर शिकागो एअरपोर्ट बाहेरमात्र प्रचंड गार वारं होतं तेव्हा स्वेटर घालावा लागला. मग लेकाच्या निलपरीतून शिकागो टू कोलंबस. मस्त गाडी, एकदम कंफर्टेबल! कसला मस्त प्रवास :dd: :dhakdhak:

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle