कोलंबस वारी -३

कोलंबस आणि निसर्ग 

कोलंबस जवळच ब्राऊन काऊंटी आहे. संरक्षित जंगल. खूप मोठ्या आकारमानाचे, अतिशय वैविध्य असलेले जंगल. झाडांचे तर वैविध्य आहेच पण विविध तळी, मोठे तलाव, डोंगर, चढउतार, विविध गावं, हवामानही वेगवेगऴं असलेली ही ब्राऊन काऊंटी! आम्ही चार दिवस तिथे वेगवेगळे रस्ते फिरलो. एक धबधबा, तीन तळी, कितीतरी जुनी-पारंपरिक खेडी, माळरान, गर्द झाडी, घनदाट जंगल, अशा कितीतरी वेगऴ्या गोष्टी अनुभवल्या. कधी कडक उन, कधी घनदाट सावली, कधी पाण्या शेजारचा थंडावा, कधी सरळ- कधी नागमोडी रस्त्याची वळणं... लेकाच्या निलपरीतून मी स्वर्गात विहरत होते जणु! अन सोबतीला होता तिथला फॉल! :dd:

मी शिकागोला उतरले तेव्हा झाडं छान हिरवी होती. थंडी अगदी ओठांवर होती पण सुरु झाली नव्हती. वारं मात्र प्रचंड जोरात अन गारेगार होतं. पण उनही कडक होतं. शिकागो ते कोलंबस प्रवासात बहुतांशी हिरवा रंगच दिसला. ओझरता एके ठिकाणी केशरी रंग दिसलेला. पण कोलंबसला आले अन 2-3 दिवसात छान थंडी पडू लागली. घरा मागच्या झाडांनी भराभर रंगीत वस्त्र परिधान करायला सुरुवात केली :)

खरं तर पहिल्या शनिरवि आम्ही लेकाच्या युनिव्हर्सिटीला जाणार होतो. कारण तिथले फॉल कलर्स खूप सुंदर, ब्राईट असतात. ह्युटन ( Houghton) हे मिशिगन मधलं गाव. कॅनडा बॉर्डरला लागून. तिथे मिशिगन टेक ही युनिव्हर्सिटी. तिथे जाणार होतो. पण मित्राचा मेसेज आला, तिथे भराभर थंडी सुरु झाली अन पानगळ सुरू झाली तिथली. मग तिकडचा बेत रहित केला. अन इंडियानातील फॉलवरच समाधान मानायचं ठरवलं. पण माझी इच्छा पूर्ण व्हायची होती फॉल कलर अनुभवण्याची. ब्राऊन काऊंटी आणि मोनाली कडे लुईव्हिल ला जाताना मनभरून फॉल कलर्स बघता आले.

तर हे कोलंबस, ब्राऊन काऊंटी आणि आसपासचे फोटो. खरं तर मी या वेळेस फिरायचं नाही म्हणून कॅमेरा नेला नव्हता. शिवाय एकटी प्रवास करणार या दडपणात कॅमेराचं ओझं नको होतं. या बद्दल अनेकांचा ओरडा खाल्ला. पण खरच न्यायला हवा होता कॅमेरा. साध्या मोबाईल मधून काढलेले हे फोटो, काही तर ताशी 80 मैल वेग असतानाचे. सो फोटोग्राफिच्या दृष्टीने काही फार बरे नाहीत. पण फॉल कलर्सचा अनुभव, एक झलक नक्कीच देतील.

काय इथली घरं, लॉन्स, शेतं, शहरं( मिनिऑपोलिस थोडंसं बघितलं) छोटी गावं, सुंदर सुंदर बंगले, बागा, हॉलोविनचे घराबाहेर ठेवलेले भोपळे, आहाहा.....

येताना मधे रेस्टरुमसाठी थांबलो. इतकं चकाचक, स्वच्छ. मी विचारलं पैसे किती द्यायचे. तर निखिल म्हणाला आपण टोल भरतो की रोडचे अन टॅक्स. त्यातूनच हे मेन्टेन करतात. कसली मस्त होती ती बिल्डिंग. एकमजली, एेसपैस, पाणी, स्वच्छता, बाहेर लॉन. सरकारी व्यवस्था इतकी छान असू शकते हे आपल्या लक्षातही येत नाही.

खरच आपण कल्पना करू शकणार नाही इतका प्रचंड मोठा, संप्पन्न देश आहे हा.

प्रवासात फॉल कलर्स बघायला मिळाले. इतकं सौंदर्य मी खरच बघितलं नव्हतं आजवर. पिवळ्यापासून मरून कलरपर्यंतच्या इतक्या छटा झाडांच्या म्हणजे ऑरेंज कलर, गुलबक्षी झाक असलेला गुलाबी रंग, काळपट मरून रंग,....अरे शब्दात, फोटोत पकडता येणार नाहीत असे रंग!

प्रत्येक घरासमोर एकतरी फॉलकलरचे झाड, सुरेख नेटकी लॉन, मेकॅनोतल्या सारखी घरं.खरच लाईफटाईम अनुभव आहे हा मला. इथे बहुतांशी सपाट प्रदेश, सो नजर टाकावी तिकडे क्षितिजापर्यंत पसरलेली शेती, घरं, शेती यात कुंपण नाही, भिंती नाहीत. इतकं सही दिसतं न हे सलग सगळं :dd:

हा असा अनुभव मी अजिबात इमॅजिनला नव्हता. मुळात मला परदेशप्रवासाची खूप काही हौस नव्हती. सो मी हा अचानक आलेला अनुभव मला खूप मजा आलीय :) इतकी स्वच्छता आहे इथे. माहित नाही पण रस्त्याच्या कडेला पाऊसपडूनही चिख्खल नव्हता. ना शेतात. मे बी इथे उंचसखल नसेल. म्हणून. पण एकूणच सगळं लख्ख आवरलेलं असा फिल. म्हणजे घरांबाहेरच्या हिरवळीवर पडलेली रंगबिरंगी पानंही इतकी सुंदर दिसत होती.

आपल्याकडे मी सरळ पाचोळा म्हटलं असतं पण इथल्याला पानांची पखरण म्हणावं वाटलं!

अगदी पहिला दिवस, हिरवा निसर्ग 

घरातून दिसणारी हिरवाई 

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle