संजीवन आठवण

एक संजीवन आठवण.... मनी साठवण

२३ डिसेंबर२०१७ .........

बरोबर ४:३० वाजता सर्व मैत्रिणी - १२ जणी जय्यत तयारीनिशी सौ. किरण गोखले, हिचे घरी पोहचलो. तशी तिची तब्येत ठीक नसते म्हणून अर्धा तास आधी एकीने जाऊन आम्ही येत असल्याची पूर्व सूचना दिली होती. एक आगळा-वेगळा आनंद ओसंडून वाहत होता. किरणही छानशी तयार झालीच झेपत नव्हते पण.....
IMG-20171223-WA0092.jpg

आज आमच्या या सखीचा ८० पूर्तीचा वाढदिवस होता.

मग रितीप्रमाणे औक्षण करून स्वेटर व पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन टाळ्या वाजवत शुभेच्छांचा वर्षाव होत असतांना
सूर निघाला Happy Birthday......
मोबाईलने अचूक नेमका हा क्षण टिपून घेतला. श्री.गोखले दादांचाही भेट देऊन सन्मान केला त्यांच्या मुलीने आमचा ग्रुप फोटो काढला. मग हसत खिदळत स्वल्पाहारचा स्वाद घेतला. गोखले दांपत्याच्या आशीर्वादाने त्यास अवीट गोडी आली होती. बाहेरगावी गेलेली सखी वेळेवर फोन करायला विसरली नाही. आनंद द्विगुणीत झाला.

IMG-20171223-WA0086.jpg

किरण गर्वाने म्हणते -- दर वेळी सर्व प्रथम तिचे ' अहो ' तिला न चुकता शुभेच्छा देतात आणि हे सांगत असतांना तिच्या चेहऱ्यावरची ख़ुशी शब्दात सांगणे मला तरी नाही जमायचे, तिच्या साश्रुपूर्ण नयनांनी ती व्यक्त केली होती.
अशी ही संजीवन आठवण मनी साठवत सखीचा निरोप घेतला.

तिच्या नातेवाईकांचे गाऱ्हाणे कळले नंतर .....आम्हास काssही करू नका म्हणाली पण आता मैत्रिणींना बरे परवानगी दिलीस !! ह्यावर तिने हेच उत्तर दिले असणार --नव्हे दिले --
" जे घडले ते अकल्पित होते, सुखद तर होतेच, नाही म्हणणे हा पर्याय असूच शकत नव्हता. कारण... मैत्री म्हणजे परस्पर आपुलकीचं जिव्हाळ्याचे, विश्वासाचं एक संजीवन नातं असतं "

विजया केळकर______
bandeejaidevee blogspot.com

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle