शिवशिवणारे हात ;-)

लेकीसाठी घरी बसण्याचा निर्णय घेतला खरा पण रिकामी वेळ मेंदू कुरतडू लागला ... छंद जोपासू म्हटलं तर खास काही छंद ही नव्हते ,वाचन सुरू होत म्हणा पण तरी काही तरी कर चा भुंगा पाठ सोडत नव्हता ... Vaitag
त्यात नवऱ्याने गरज नसताना उगाच एके ठिकाणी पैसे उधळले ,(जी अर्थात त्याची नेहमीची सवय आहे म्हणा ) तेंव्हा माझी सटकली :raag: नी म्हटलं बघ मी पण कसे उधळते नको तिथे ...नी जाऊन शिवणाचे मशीन आणले ... मी याला उधळणे म्हणाले कारण माझा नी शिवणाचा दूर दूर पर्यंत संबंध नव्हता उलट लहानपणी आईच्या मशीनवर ,'शिकव ना मला' म्हणून बसले तर सुईच मोडली तर आई इतकी ओरडली की मी धसकाच घेतला होता शिवनकामाचा...
त्यामुळे मी मशीन वापरणे शक्यच नव्हते  68 ,
रागाच्या भरात घेतली खरं मशिन नी ठेवली तशीच वर्षभर मग माझंच मन चुटपुटायला लागलं , "श्या उगीच केलं हे ,मी "
ज्याला अद्दल घडावी म्हणून केलं त्याला ढिम्म फरक पडला नव्हता की त्याने विचारलं ही नाही की "काय करते आहेस त्या मशीनचे"
त्यामुळे तयार ठेवलेली भारी भारी उत्तर फुकटच गेली होती :ड

मग झक मारत शिवनक्लास शोधू लागले नी मला साक्षात्कार झाला की अलमोस्ट सगळे शिवनक्लास बंद झालेत , आमच्या जवळपास तर एकही क्लास नव्हता... :surprise:
ह्या शोधाशोधीत अजून वर्ष गेलं , शेवटी एका मैत्रिणीने शोधून दिला क्लास ,इतकंच नाही नाव घालायला सोबत ही आली , तिथल्या टिचरशी ओळख करून दिली . मी त्यांना माझा फोबिया आधीच सांगितला , त्यांनी खूप सुंदर शिकवलं ,माझ्या मनातली मशीनची भीती पूर्ण काढून टाकली ... आज जे काही मी शिवते आहे त्याबद्दल थँक्स टू हर Lovestruck

अर्थात माझ्या लौकिका प्रमाणे मी काही तिथे जास्त टिकले नाही , मला मशीन चालवता येते हेच माझ्यासाठी खूप होते .
कपडे शिवण्यात मला इंटरेस्ट वाटला नाही मग कुणा कुणाला गिफ्ट देण्यासाठी छोट्या छोट्या गोष्टी शिवू लागले ,त्यात मजा येऊ लागली ... :ty:
मैत्रिणींना ही आवडू लागल्या त्या गोष्टी , त्या ऑर्डर देऊन बनवून घेऊ लागल्या ... मन गुंतवण्यासाठीचा टाईमपास माझा ,छोट्याश्या बिझनेस मध्ये कधी बदलला ते कळलंच नाही.
आजवर शिवलेल्या गोष्टी इथे टाकतेय बघा आवडताहेत का तुम्हाला ?

हे सुरवातीचे काम ,फार फिनिशिंग नाहीय पण मला कॉन्फिडन्स देऊन गेलं हे Nerd
IMG-20171230-WA0055.jpg

IMG-20171230-WA0056.jpg

ओटीचा बटवा
कुणाची ओटी भरली की नंतर तिच्यासाठी पिशवी शोध हे काम ,ह्या बटव्यामुळे कमी झाले Cool नवीन नवरी साठी बेस्ट गिफ्ट Love

IMG-20171230-WA0029.jpg

कोस्टर्स

IMG-20171230-WA0039.jpg

ही सुरवात बटव्यांची, हा गिफ्ट द्यायला शिवला नी खूप आवडला सगळ्यांना ,मग ऑर्डर्स सुरू झाल्या.

IMG-20171230-WA0038.jpg

हे पुढच्या ऑर्डर्स चे बटवे
IMG-20171230-WA0042.jpg

IMG-20171230-WA0041.jpg

IMG-20171230-WA0043.jpg

IMG-20171230-WA0044.jpg

IMG-20171230-WA0045.jpg

IMG-20171230-WA0046.jpg

IMG-20171230-WA0047.jpg

IMG-20171230-WA0048.jpg

IMG-20171230-WA0049.jpg

IMG-20171230-WA0051.jpg

IMG-20171230-WA0032.jpg

हा साबाच्या वाढदिवसाला त्यांच्या ड्रेसला मॅचिंग शिवला Cool

IMG-20171230-WA0050.jpg

हे ह्यावर्षीच्या सीसासाठी शिवलेलं काम
डेनिम डायरी कव्हर
IMG-20171227-WA0012_0.jpg

IMG-20171227-WA0016_0.jpg

नेकपीस

IMG-20171227-WA0013_0.jpg

IMG-20171227-WA0009_0.jpg

जापनीज नॉट बॅग , ही रिव्हर्सिबल आहे
IMG-20171227-WA0014_0.jpg

IMG-20171227-WA0011_0.jpg

31 डिसेंबर च्या मध्यरात्रीचा मुहूर्त साधून fb पेज सुरू केलं आहे ,प्लिज विझिट करा नी आवडलं तर लाईक करा

https://www.facebook.com/pg/nyaarecreations/about/

Keywords: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle