शिवणकाम

शिवणाचे उद्योग

पोर्टेबल शिलाई मशीन काही वर्षे वापरतेय पण क्रोशे बॅग्ज च्या लायनींगसाठी आणि इतर किडुक मिडुक घरगुती कामासाठीच अजुन वापरत होते. क्रोशे बॅग्ज च्या लायनींग साठी एकेक नवीन नवीन ऍडीशन करत होते तेव्हा मात्र मनात यायचं की एखादी पुर्ण बॅग शिवून पहायचं पण मुहूर्त सापडत नव्हता. पण प्लॅस्टिक बंदीच्या निमित्ताने बाजारात आलेली भाजीची पिशवी पाहिली आणि म्हटलं पाहुचया जमते का. ट्रायल म्हणून जुन्या कपड्यांवरच प्रयोग करूया म्हटलं आणि जुने वापरात नसलेले कुर्ते होते त्यांनाच घेतलं हाताशी आणि बऱ्यापैकी मोठ्या साईज चे कप्पे असलेली जम्बो बॅग शिवली चुकत माकत.

Keywords: 

कलाकृती: 

शिवशिवणारे हात ;-)

लेकीसाठी घरी बसण्याचा निर्णय घेतला खरा पण रिकामी वेळ मेंदू कुरतडू लागला ... छंद जोपासू म्हटलं तर खास काही छंद ही नव्हते ,वाचन सुरू होत म्हणा पण तरी काही तरी कर चा भुंगा पाठ सोडत नव्हता ... Vaitag
त्यात नवऱ्याने गरज नसताना उगाच एके ठिकाणी पैसे उधळले ,(जी अर्थात त्याची नेहमीची सवय आहे म्हणा ) तेंव्हा माझी सटकली :raag: नी म्हटलं बघ मी पण कसे उधळते नको तिथे ...नी जाऊन शिवणाचे मशीन आणले ... मी याला उधळणे म्हणाले कारण माझा नी शिवणाचा दूर दूर पर्यंत संबंध नव्हता उलट लहानपणी आईच्या मशीनवर ,'शिकव ना मला' म्हणून बसले तर सुईच मोडली तर आई इतकी ओरडली की मी धसकाच घेतला होता शिवनकामाचा...

Keywords: 

Subscribe to शिवणकाम
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle