कलर्ड पेन्सिल आर्ट - प्लेन टायगर (फुलपाखरु)

हाय मैत्रिणींनो,

२०१८ सालातले हे कलर्ड पेन्सिल माध्यमातले पहिले चित्र मी शेअर करतेय.
या वर्षी मी जास्तीत जास्त चित्रे काढण्याचा संकल्प केलाय, बघूया कसे जमतेय.

खालील चित्र 'प्लेन टायगर' (किंवा आफ्रिकन मोनार्क) जातीच्या फुलपाखराचे आहे. फुलपाखरांचा छंद मला अलिकडेच लागलाय. किंबहुना फोटोग्राफी करायला लागल्यापासून माझे फुलपाखरांकडे अंमळ जास्तच लक्ष जायला लागलेय. फोटोग्राफी करण्याचाही छंद अलिकडचाच, हेतू हा की चित्रासाठीचा रेफरन्स माझ्याकडेच हातासरशी असावा! असो.

हे प्लेन टायगर फुलपाखरु आपल्याकडे बर्‍यापैकी कॉमनली दिसतं. बहुतेक वेळा मला ती लॅन्टाना म्हणजे घाणेरीच्या फुलांवर बागडताना दिसली आहेत.

हे चित्रं मी 130gsm जाडीच्या कागदावर वेगवेगळ्या ब्रँड्ज्च्या पेन्सिलिंनी काढले आहे. सर्वात कठीण भाग पंखांच्या बॉर्डर्स होत्या. द्रुश्य पंखांच्या मागे असणार्‍या पंखांवरील ठिपके काढताना दमछाक झाली. पण म्हणतात ना, आवडीचे काम करताना श्रम जाणवत नाहीत तसं काहीसं झालं. smile

plain tiger.jpg

/* */ //