drawing

Neurographic Art

हाय मैत्रिणींनो,

शीर्षक वाचून जरा गोंधळात पडला असाल ना? तुम्ही म्हणाल ईंक्टोबर झालं आता हे कसले नवीन खूळ आणलं हिनं? Bigsmile Haahaa 2
तर काय झालं, सध्या फेसबुक, ईन्स्टा सगळीकडेच या हॅशटॅग खाली खूप सुंदर सुंदर चित्रे नजरेला पडतायत. ती बघून मलाही तश्या पध्दतीची चित्रे काढायचा मोह व्हायला लागला. म्ह्णून म्ह्टलं बघावं हे प्रकरण आहे तरी काय नक्की?

Keywords: 

कलाकृती: 

इन्क्टोबर (Inktober 2021)

येत्या ४ ५ दिवसातच तोच तो आपला लाडका ऑक्टोबर सुरु होतोय आणि २०१८ पासुन मैत्रिणवर दर ऑक्टोबरला इन्क्टोबरचे वारे वाहतायत त्यालाच अनुसरुन यंदा ही ती प्रथा पाळावीच लागेल ना Biggrin
पण ही प्रथा जाचक नाही हा नवनिर्मितीचा आनंद देणारी, उत्साहाने भारलेली अशी प्रथा आहे तर मैत्रिणींनो तुम्ही तयार आहात ना इन्क्टोबर चॅलेंज साठी?? आपापली आयुधे तयार ठेवा बघू.. म्हणजे आपले स्केच बुक, पेन्स, ईन्क्स, ब्र्श ई... ३१ ऑक्टोबर पर्यंत धम्माल करु.

Keywords: 

कलाकृती: 

कलर्ड पेन्सिल आर्ट - प्लेन टायगर (फुलपाखरु)

हाय मैत्रिणींनो,

२०१८ सालातले हे कलर्ड पेन्सिल माध्यमातले पहिले चित्र मी शेअर करतेय.
या वर्षी मी जास्तीत जास्त चित्रे काढण्याचा संकल्प केलाय, बघूया कसे जमतेय.

खालील चित्र 'प्लेन टायगर' (किंवा आफ्रिकन मोनार्क) जातीच्या फुलपाखराचे आहे. फुलपाखरांचा छंद मला अलिकडेच लागलाय. किंबहुना फोटोग्राफी करायला लागल्यापासून माझे फुलपाखरांकडे अंमळ जास्तच लक्ष जायला लागलेय. फोटोग्राफी करण्याचाही छंद अलिकडचाच, हेतू हा की चित्रासाठीचा रेफरन्स माझ्याकडेच हातासरशी असावा! असो.

Keywords: 

कलाकृती: 

कलर्ड पेन्सिल ड्रॉइंग वर्कशॉप!

हाय मैत्रिणींनो,

मी वर्षा. माबोवर तुम्ही कदाचित माझी कलर्ड पेन्सिल माध्यमातील चित्र पाहिली असतील.
मागील वर्षी मला काही जणांनी हे ड्रॉइंग शिकवशील का असं विचारलंही होतं, तेव्हा लगेच जमणार नव्हतं पण तेव्हापासून याबद्दल मनात घोळत होतं. तर आता या नवीन वर्षात या दिशेने मी पाउल उचलेले असून कलर्ड पेन्सिल ड्रॉईंगची बेसिक टेक्निक्स शिकवणारे चार तासांचे वर्कशॉप मी येत्या २९ जानेवारीला दादरच्या किंग जॉर्ज शाळेमध्ये १ ते ५ या वेळात घेत आहे, हे सांगताना मला खूप आनंद होतो आहे.

वयोगटः वय वर्षे ७ आणि पुढे कितीही! :)
फी: रु.६०० प्रत्येकी फक्त.

Keywords: 

कलाकृती: 

जुनी स्केचेस

मला काही भारी चित्र काढता येत नाही. पण मला चित्रं काढायला मात्र भारी आवडते!! :heehee:

आईने व्हॉट्सॅपवर ही स्केचेस पाठवली अन विस्मरणात गेलेल्या कितीतरी गोष्टी आठवल्या! मी सदोदित कुठल्यातरी पुस्तकातून पाहून चित्रे काढायचे. मजा होती एकदम!! ही सगळी १२ एक वर्षं जुनी आहेत. माझी चित्रकला आता ह्याहीपेक्षा खराब झाली आहे. :) एनीवे- हसू नका बरे!

(शेवटचे सगळ्यात भारी मी नाही काढलेले. माझी चित्रकार मैत्रीण मला शिकवत होती)

Keywords: 

कलाकृती: 

ImageUpload: 

Subscribe to drawing
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle